Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Pramod Mahajan Garden : प्रमोद महाजन कला उद्यानाला अधिक सुंदर बनवण्याची आयुक्तांची ग्वाही

Pramod Mahajan Garden : प्रमोद महाजन कला उद्यानाला अधिक सुंदर बनवण्याची आयुक्तांची ग्वाही

मुंबई : दादर येथील प्रमोद महाजन कला उद्यानात आवश्यक असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील. स्वच्छतागृह, वीज, पाणी आदी सुविधा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिल्या जातील. या उद्यानाला अधिक सुंदर बनविण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी या उद्यानातील ज्येष्ठ नागरिक समूहाच्या सदस्यांना यावेळी दिली.



दादर (पश्चिम) येथील प्रमोद महाजन कला उद्यानाला प्रत्यक्ष भेट देऊन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बुधवारी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहणी केली. उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रमोद महाजन कला उद्यान हे परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यास ते साठविण्यासाठी उद्यानामध्ये भूमिगत टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. या टाकीवर सुरक्षेचे सर्व नियम आणि उपाययोजनांचा विचार करुन हिरवळ (लॉन) लागवडीसंदर्भात अभ्यास करावा. उद्यानात पुरेसा प्रकाश राहावा, यासाठी ठिकठिकाणी वीजेच्या दिव्यांची उभारणी करावी.

Comments
Add Comment