मुंबई: आज आम्ही तुम्हाला जिओच्या एका खास रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत. यात युजर्सला दररोज २ जीबी डेटा वापरण्यास मिळेल. जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत केवळ १९८ रूपये आहे. हा रिचार्ज जिओच्या पोर्टल तसेच अॅपव उपलब्ध आहे.
जिओच्या १९८ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे. जिओच्या १९८ रूपयांच्या रिचार्ज एकूण २८ जीबी डेटा मिळेल.
जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला १०० एसएमएसचा वापर कऱण्यास मिळेल. यामुळे कम्युनिकेशनसाठी फायदा होईल.
इतकी मिळणार व्हॅलिडिटी
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला केवळ १४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याची माहिती जिओच्या पोर्टलवर लिस्टेड आहे. जिओचा हा रिचार्ज त्या युजर्ससाठी आहे जे लाईव्ह क्रिकेटसाठी सर्वाधिक डेटा पॅक शोधत आहेत.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला काही अॅप्स कॉम्प्लिमेंट्री मिळतात. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा समावेश आहे.