Tuesday, May 13, 2025

विदेशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Balochistan Firing : बलुचिस्तानमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्याकडून बसमधील ७ प्रवाशांवर गोळीबार

Balochistan Firing : बलुचिस्तानमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्याकडून बसमधील ७ प्रवाशांवर गोळीबार

लाहोर : पाकिस्तामधील बलुचिस्तान प्रांतात लाहोरला जाणाऱ्या बसवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी आधी बस थांबवली आणि बसमधील सर्व प्रवाशांचे ओळखपत्र तपासली. त्यानंतर सात प्रवाशांची गोळी घालून हत्या केली. नैऋत्य बलुचिस्तानमधील बरखान जिल्ह्यात हा हल्ला झाला.


बलुचिस्तानमधील बरखान जिल्ह्यात सुमारे ४० सशस्त्र पुरूषांच्या गटाने अनेक बस आणि वाहने थांबवली, ओळखपत्रे तपासली आणि त्यानंतर बसमधून सात प्रवाशांना बाहेर काढले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये सर्व सातही पंजाब प्रांतातील आहेत. या भागाचे सहाय्यक आयुक्त खादिम हुसेन यांनी सांगितले की, बरखानला दक्षिण पंजाबमधील डेरा गाझा खान शहराशी जोडणाऱ्या महामार्गावर हा हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही आणि हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.



अधिकाऱ्यांनी सांगितले की, या परिसराला वेढा घातला आहे पण हल्लेखोर पळून गेले आहेत. शुक्रवारी कोळसा खाण कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला लक्ष्य करून झालेल्या बॉम्ब हल्ल्याच्या काही दिवसांनंतर ही घटना घडली.

Comments
Add Comment