लाहोर : आज चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे सामने होणाऱ्या स्टेडियम्सवर तिरंगा नसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला कराचीतील नॅशनल स्टेडियमवर भारताचा तिरंगा लावला आहे.
कराची स्टेडीयमवर तिरंगा न लावण्याचा हा वाद झाला तेव्हा पीसीबीने स्पष्टीकरण देताना आयसीसी नियमांचा हवाला दिला होता. बोर्डाने म्हटले की, आयसीसीने त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फक्त चार ध्वज फडकवण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामध्ये आयसीसी, पीसीबी आणि दोन सहभागी संघांचा समावेश आहे.पण, त्यावरून पीसीबीला टीकेचा सामना करावा लागला आणि अखेर मंगळवारी राष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय ध्वज दिसला.
Balochistan Firing : बलुचिस्तानमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्याकडून बसमधील ७ प्रवाशांवर गोळीबार
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही यावर सांगितले की, इतर सहभागी देशांसोबत भारतीय ध्वजही फडकवला पाहिजे “प्रथम, भारतीय ध्वज तिथे होता की नाही याची खात्री करावी. जर तो तिथे नव्हता, तर तो लावायला हवा होता. सर्व सहभागी देशांचे ध्वज तिथे असायला हवे होते,” असे राजीव शुक्ला यांनी मंगळवारी सांगितले होते.
तिरंगी मालिकेत पाकिस्तानला न्यूझीलंडकडून दुहेरी पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे पाकिस्तानचा संघ विजयी सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असेल. २३ फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सामना भारताशी होईल आणि तोही सोपा सामना नसेल. जर पाकिस्तान दोन्ही सामने गमावले तर ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडतील.