Thursday, March 27, 2025
Homeमहाराष्ट्रनेत्रदीपक सोहळ्यात रंगला शिवपूजन सोहळा

नेत्रदीपक सोहळ्यात रंगला शिवपूजन सोहळा

पुणे : शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीवर होणारा पुष्पवर्षाव… पारंपरिक पद्धतीने काढलेली पालखी मिरवणूक… रॉयल एनफिल्डवर स्वार होऊन बाईकर्सने शिवरायांना दिलेली मानवंदना… शेकडो दिव्यांनी केलेली शिवरायांची आरती आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत जल्लोषपूर्ण वातावरणात शेकडो पुणेकरांच्या उपस्थितीत शिव स्वराज्य यात्रेचा समारोप आणि शिवपूजन सोहळा रंगला.

आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने टोकियो येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि भारतातील १३ राज्यातून सुमारे ८ हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या शिव स्वराज्य यात्रेचा समारोप गणेश कला क्रीडा मंच येथे झाला. यावेळी एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे,आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते.

Vicky Kaushal Shivjaynti Special : विकी कौशलच्या प्रमुख उपस्थितीत आग्र्याच्या किल्ल्यावर शिवजयंती होणार साजरी

अखिल जपान भारतीय महासंघाचे अध्यक्ष आणि एदोगावा इंडिया कल्चर सेंटर, टोक्योचे संचालक योगेंद्र पुराणिक यांच्या सहकार्याने स्मारक साकारणार आहे. आम्ही पुणेकर आयोजित शिवस्वराज्य यात्रेची दखल घेत लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीने संस्थेचा सन्मान करण्यात आला. २०२३ साली कुपवाडा येथे सैनिकांना स्फूर्ती देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले.

अशाच प्रकारचे लोक वर्गणीतून साकार झालेले जागतिक स्मारक टोकियो शहरात होत आहे. कार्यक्रमात जपानमधील एदोगावा इंडियन कल्चरल सेंटरचे विश्वस्त योगेंद्र पुराणिक यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मनोगत व्यक्त केले. याशिवाय शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी यांनी शिवकालीन युद्ध कला सादरीकरण, राम देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -