Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाPAK vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव

PAK vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव

कराची : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला ६० धावांनी हरवले. या एका पराभवामुळे यजमान पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे.

कराची नॅशनल स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात किवी संघाने पहिल्यांदा खेळताना ३२० धावांचा स्कोर केला होता. याला उत्तर देताना पाकिस्तानचा संघ पुरता थकला आणि त्यांचा डाव २६० धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमध्ये आता भारत आणि बांगलादेशविरुद्ध सामने खेळायचे आहेत.

या सामन्यात कर्णधार मोहम्मद रिझवानने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांना चांगलाच भारी पडला. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडने ३२० धावा केल्या. न्यूझीलंडचे फलंदाज विल यंग आणि टॉम लाथम यांनी शतकी खेळी केली. विल यंगने १०७ धावा तडकावल्या तर टॉमने ११८ धावांची तडाखेबंद खेळी केली. या दोघांच्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडला ३२० धावांचा स्कोर उभा करता आला.

पाकिस्तानचा संघ फलंदाजी करताना सुरूवातीपासूनच संथ वाटला. त्यांच्याकडून बाबर आझमने ६४ धावांची खेळी केली. मात्र त्यासाठी त्याला ९० बॉल खर्च करावे लागले. तर खुशदिल शहाने ६९ धावा केल्या. सलमान अघाने ४२ धावांची खेळी केली. मात्र हे तीनही फलंदाज संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -