Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीChhaava : 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर तुफानी! अवघ्या चार दिवसांत कमावले तब्बल २००...

Chhaava : ‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर तुफानी! अवघ्या चार दिवसांत कमावले तब्बल २०० कोटी

मुंबई : विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ (Chhaava) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाने पहिल्या दिवशीच २८.५० कोटींचा दमदार गल्ला (Box Office Collection) जमवला होता. त्यानंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने जगभरात तब्बल २०० कोटींची कमाई केली आहे.

Shivjayanti 2025 : लज्जास्पद! छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला वाहिली श्रद्धांजली, राहुलनी केली चूक

मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती झालेल्या छावाने पहिल्या दिवशीच २८.५० कोटींचा दमदार गल्ला जमवला होता. त्यानंतर चित्रपटाच्या उत्कृष्ट कथानकामुळे आणि तगड्या स्टारकास्टमुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी आणखी मोठी वाढ झाली आणि तब्बल ३४ कोटींची कमाई झाली. आता तिसऱ्या दिवशी गाठला ८६ कोटी रुपयांचा टप्पा. त्यानंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने जगभरात तब्बल २०० कोटींची कमाई केली आहे.

ट्रेड ट्रॅकिंग या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार छावा या चित्रपटाने चार दिवसांत देशात आणि देशाबाहेर अशी मिळून बॉक्स ऑफिसवर तब्बल १४० कोटी रुपयांची कमाई सोमवारपर्यंत केली होती. त्यानंतर कलेक्शनमध्ये घट झाली आणि सोमवारी केवळ २४ कोटी कमावले. मात्र या चित्रपटाचा वारू बॉक्स ऑफिसवर असाच उधळत आहे. दुसरीकडे परदेशाच्या चित्रपटाने आतापर्यंत २७ कोटी कमावले. ज्यामुळे जगभरातील चार दिवसांची एकूण कमाई १९५.६० कोटींवर पोहोचली. त्यामुळे लवकरच हा चित्रपट २०० कोटींचा टप्पा ओलांडणार आहे.

या चित्रपटाची देशभरातील कमाईचा आकडा वाढत असताना जगभरातीलही कमाईचा आकडा वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल म्हणून दाखवले जात आहे. विकी कौशलच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरुन दाद मिळत आहे. बिगेस्ट ऑपनरमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांनाही छावा चित्रपटाने मागे टाकले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -