मुंबई: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा(ICC Champions Trophy 2025) पहिला सामना खेळवला जात आहे. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडने ३२० धावा केल्या. न्यूझीलंडचे फलंदाज विल यंग आणि टॉम लाथम यांनी शतकी खेळी केली. विल यंगने ११७ धावा तडकावल्या तर टॉमने ११८ धावांची तडाखेबंद खेळी केली.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली सुरूवात केली होती मात्र मधल्या फळीतील फलंदाज आणि सलामीवीर विल यंगने पाकच्या गोलंदाजांना धुवून काढले. शेवटच्या षटकांमध्ये तर पाकिस्तानचे गोलंदाज जाम हैरा झाले. त्यांना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलेच कुटले. पाकिस्तानच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या शाहीन आफ्रिदीला संपूर्ण सामन्यात एकही विकेट मिळवता आला नाही.
🏏 New Zealand sets a big total! 🇳🇿
🔹 Latham – 118* (104) 💯🔥
🔹 Young – 107 (113) 💯👏
🔹 Phillips – 61 (39) ⚡New Zealand posts 320/5 vs Pakistan in the Champions Trophy opener! Can Pakistan chase this down? 🤔#ChampionsTrophy2025 #PAKvNZ #NZvsPAK #PakvsNz #Cricket pic.twitter.com/hDbuX0DHAo
— Planet Reporter🌐 (@planetreporter1) February 19, 2025
खराब सुरूवातीनंतर विल यंगने सांभाळला मोर्चा
न्यूझीलंडच्या फलंदाजांची सुरूवात अडखळत झाली होती. सलामीचा फलंदाज डेवोन कॉनवे बाद झाल्यानंतर केन विल्यमसन्सही पुढील षटकांत १ धाव करून बाद झाला होता. कॉनवेला अबरार अहमदने ८व्या षटकांतील तिसऱ्या बॉलवर बोल्ड केले. पुढील षटकांतील पहिल्या बॉलवर केन विल्यमसन्सला १ धाव करून बाद झाला.