मुंबई : फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन अर्थात फेडएक्स या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. काही जण फेडएक्सचे प्रतिनिधी असल्याचा बनाव करतात आणि तुमच्या पार्सलमध्ये अवैध वस्तू आहेत; असे सांगतात.या दाव्याला जे बळी पडतात त्यांची कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बनावट अधिकाऱ्याशी गाठ घालून दिली जाते, जे कायदेशीर कार्यवाहीची किंवा डिजिटल अटकेची धमकी देतात आणि तो त्रास टाळण्यासाठी तत्काळ पैशांची मागणी करतात. एकदा पैसे हस्तांतरित केल्यानंतर हे घोटाळेबाज गायब होतात आणि फसवणुकीला बळी पडलेल्यांचे आर्थिक नुकसान होते.
Shivjayanti 2025 : लज्जास्पद! छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला वाहिली श्रद्धांजली, राहुलनी केली चूक
लक्षात ठेवा, फेडएक्स कोणत्याही अनाहूत ईमेल, ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज द्वारे तुमच्या खात्याची किंवा ओळखीसंबंधी व्यक्तिगत माहिती मागत नाही. तसेच फेडएक्स कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संबंधित नाही आणि त्यांच्या वतीने कार्यवाही देखील करत नाही. कुरिअर सेवांचे प्रतिनिधित्व करण्याचे नाटक करणाऱ्यांपासून किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांपासून सावध रहा. धमकी किंवा संदिग्ध विनंतीला प्रतिसाद देताना पैसे हस्तांतरित करू नका. अशा एखाद्या फसवणुकीला बळी पडल्यास १९३० वर कॉल करून किंवा cybercrime.gov.in वर ऑनलाईन तक्रार नोंदवून माहिती द्या; असे आवाहन फेडएक्सने केले आहे.