Monday, March 24, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNitesh Rane : शिवप्रेमींची माफी मागावी अन्यथा..! राहुल गांधी यांच्या पोस्टमुळे मंत्री...

Nitesh Rane : शिवप्रेमींची माफी मागावी अन्यथा..! राहुल गांधी यांच्या पोस्टमुळे मंत्री नितेश राणे आक्रमक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या (Shivjayanti 2025) दिवशी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट केले आहे. यामुळे राहुल गांधी वादात अडकले आहेत. त्यांनी केलेले हे ट्वीट चर्चेत असताना शिवप्रेमींसह राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार टीका केली आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना माफी मागण्याचे आव्व्हान केले आहे. अन्यथा पुढे त्यांना शिवप्रेमींच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.

‘…म्हणून छावा चित्रपटावरील करमणूक रद्द करू शकत नाही’

 राहुल गांधी यासारख्या औरंग्याच्या पिल्लावळाकडून दुसरी काहीच अपेक्षा नाही. हे हिरवे साप औरंग्याच्या विचारावर आणि देशावर राजकारण करतात. यामुळे त्यांना नेहमी शिवरायांच्या स्वराज्याचा द्वेशच असतो. जगभरात छत्रपती शिवरायांचा आदर करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्रयाच राज्याच्या जयंतीला स्वत:ला देशाचे मोठे नेते समजणारे लोक श्रद्धांजलीचा उल्लेख करतात. महापुरुषाबाबत असे वक्त्व्य सहन केले जाणार नाही. त्यामुळे राहुल गांधीने देशातील सर्व शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. त्याचबरोबर शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालं पाहिजे. जर हे नाही केलं तर महाराष्ट्रातील शिवप्रेमी त्याला इथे किती वेळ येऊ देतात ते पाहणं गरजेचं असेल, असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.

यांना घाणेरडं राजकारण करता येत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये २०२३च्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. याबाबत विरोधकांकडून टीका होत आहेत. यावरही नितेश राणे यांनी घणाघात केला आहे. ‘महायुतीचे सरकार शिवरायांचा पुतळा आणि स्मारक बनवण्याचा प्रवासावर छोट्या छोट्या गोष्टींबाबत चर्चा करत असतो. घडलेली घटना निस्तारण्यासाठी आम्ही इथेच आहोत. इतरांसारखं केवळ फोटो काढण्यासाठी जात नाही. त्यावेळी फोटोसेशन करण्यासाठी पेंग्विनसारखे इतर प्राणी प्राणीसंग्रहालयातून बाहेर आले होते. अशा लोकांना मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहावंस वाटत नाही की, तुम्ही अशा पद्धतीने स्मारक उभं करताय याची माहिती काय आहे? या लोकांना केवळ घाणेरडं राजकारण करता येत, इतर काही नाही, असा टोला मंत्री नितेश राणे यांनी लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -