Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीफुटबॉल सामन्यादरम्यान दुर्घटना, आतिषबाजीमुळे मैदानात पसरली आग, ३० जण होरपळले

फुटबॉल सामन्यादरम्यान दुर्घटना, आतिषबाजीमुळे मैदानात पसरली आग, ३० जण होरपळले

तिरूअनंतपुरम: केरळमध्ये मंगळवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. मल्लपुरम जिल्ह्याच्या अरिकोड शहरात फुटबॉल सामन्यादरम्यान ३० हून अधिक प्रेक्षक आगीमुळे होरपळले. सामन्याच्या सुरू होण्याच्या आधी ही दुर्घटना घडली. खरंतर, सामन्याच्या आधी आयोजकांनी येथे आतिषबाजीचा मोठा कार्यक्रम ठेवला होता. या दरम्यान, फटाके अनियंत्रित झाल्याने स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांमध्ये जाऊन फुटले. अशातच एकच गोंधळ झाला.

दिलासादायक बाब म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीमध्ये ३ जण गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यातील अरिकोडजवळ एका फुटबॉल सामन्यादरम्यान अपघात झाला. यात आतषबाजीमुळे ३० जण जखमी झाले. फुटबॉल सामना सुरू होण्याआधी फटाके फोडण्यात आले. हे फटाके प्रेक्षकांमध्ये जाऊन फुटले. सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -