Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीमिडी बस गाड्यांच्या कमतरतेमुळे बस मार्ग बंद करण्याची वेळ

मिडी बस गाड्यांच्या कमतरतेमुळे बस मार्ग बंद करण्याची वेळ

भांडुप, कांजूरमार्गसारख्या ठिकाणी मोठा फटका बसणार

मुंबई(अल्पेश म्हात्रे): बेस्ट उपक्रमाकडील बस गाड्या या पुढील काही महिन्यात भंगारात जात असल्याने व पर्यायी मिडी बस गाड्या नसल्याने बेस्ट उपक्रमावर मिडी बस मार्ग बंद करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या वेळेस बस गाड्या नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होणार असून भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, मालाड येथे संतापाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात बस गाठ्यांची प्रबंड कमतरता निर्माण झाली आहे. स्वमालकीच्या बस गाडया भंगारात जात असल्याने व त्यातच खाजगी बस गाड्या वेळेवर दाखल न झाल्याने बेस्टला स्वतःच्या व कंत्राटदाराच्या बस गाडया पुरवण्यात कसरत करावी लागत आहे. त्यात स्वमालकीचा बस ताफा हा एक हजारपेक्षा कमी झाला असून येत्या पुढील तीन ते चार महिन्यात जे एन एन यु आर एम अंतर्गत साडेसातशे बस गाड्याही भंगारात जाणार आहेत. त्यात २५० मिट्टी बस गाडांचा समावेश असून त्या बंद झाल्या तर भांडुप, मुलुंड, कांजूरमार्ग, घाटकोपर, मालाड मासारख्या डोंगराळ व छोट्या रस्त्यांवर धावणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे. सध्या कंत्राटदारांकडे मिडी बस गाड्या नाहीत. मिडी बस गाड्या असलेल्या हंसा सिटी बस व एम पी जी या कंत्राटदारांनी या आधीच बेस्टला रामराम ठोकला

त्यातच येत्या काही महिन्यात बेस्टच्या ताफ्यातून मिडी बसगाड्या हद्दपार झाल्यास व मिट्टी बस गाड्या उपलब्ध नसल्याने करायचे काय असा प्रश्न बेस्ट अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. भांडुप कांजुर मार्ग येथील टेंभी पाड़ा, नरदास नगर, भट्टीपाडा, तुलशेत पाडा, कोंकण नगर, हनुमान नगर, प्रतापनगर, विक्रोळी येथील नाग बाबा मंदिर, पार्कसाईट, मालाड येथील आप्पा पाडा तसेच कुलाबा येथील गीता नगर, जुहू येथील मोरा गांव सांताक्रूझ येथील दत्त मंदिर मेथील बस प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे बेस्टच्या या मिनी बसगाड्यांचा वापर जेथे प्रवाशांचा कमी प्रतिसाद आहे त्याठिकाणी हि करण्यात येतो. सध्या ओलेक्ट्रा व डागा या कंत्राटदाराकडे मिनी बस गाड्या असून त्या या छोट्या व चिंचोळ्या मार्गावर धावू शकत नाहीत.

बसमार्गावर परिणाम

[१३९ छत्रपती शिवाजी महाराण टर्मिनस ते गीता नगर। ६०२ कांजूरमार्ग ते हिरानंदानी पवई 1 ६०३ अमृत नगर ते आर सी एफ वसाहत भांडुप] .६०५ भांडुप ते टेम्बीपाडा ] [६०६ भांडुप ते नरदास नगर ] [ ६०७भाखुप वे तुलशेतीपाडा [ ६०८ कांजूरमार्ग ते हनुमान नगर] [ ६१२ काजूरमार्ग से हनुमान नगर मार्ग प्रताप नगर [ ६१३ विद्याविहार पश्चिम ते सुंदर बाम [६१८ सांताक्रूझ पूर्व ते दत्त मंदिर गार्ग। ६२४ मालाड ते आप्पापाडा ॥ ६२७अंधेरी स्थानक ते नोरा गांव जुहू ।

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -