Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीGBS : पुणेकरांवर जीबीएसचे वाढते सावट! आणखी एका तरूणाचा मृत्यू

GBS : पुणेकरांवर जीबीएसचे वाढते सावट! आणखी एका तरूणाचा मृत्यू

मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यभरात जीबीएसच्या (GBS) रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई अशा ठिकाणाहून जीबीएसचे रुग्ण आढळत असून पुणे शहरात या आजाराचे सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे. आतापर्यंत पुण्यात ८ जणांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला होता. तर आता यात आणखी एका तरूणाची भर पडली आहे. (pune news)

Sthal Trailer : ग्रामीण भागातील लग्नाची गोष्ट दिसणार; बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच!

पुण्यातल्या वाघोली येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाचा जीबीएस आजारामुळे मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या तरुणाला जीबीएसची लागण झाली होती. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाला श्वसनाला त्रास होत होता आणि स्नायू खूपच कमजोर झाले होते. ससून रुग्णालयात या तरुणावर ३ फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर आता पुण्यात जीबीएस रुग्णांच्या मृतांचा आकडा ९ वर गेला असून राज्यातील जीबीएस रुग्णांच्या मृत्यूचा आकडा १४ वर गेला आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये सध्या जीबीएसचे एकूण २१० रुग्ण आहेत. यामधील ४१ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर उर्वरीत रुग्णांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -