मुंबई : स्मार्ट सिटी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहरात सातत्याने नवीन प्रोजेक्ट सुरु करण्यात येतात. अशातच आता मुंबई महानगर प्रदेशाला विकसित करण्यासाठी एमएमआरडीएने मास्टर प्लॅन तयार केला आहे. यामुळे मुंबई सारख्या महागड्या शहरात कामासाठी आलेल्या लोकांना चांगलाच फायदा होणार आहे. (Mumbai News)
GBS : पुणेकरांवर जीबीएसचे वाढते सावट! आणखी एका तरूणाचा मृत्यू
एमएमआरडीएने गृहनिर्माण क्षेत्र विकसित करण्याची योजना आखली आहे. यामध्ये सिंगापूरप्रमाणेच मुंबई विकसित करण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरमध्ये बांधल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमधील ३० ते ४० टक्के घरे भाड्याने घरांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या घरांचे कमाल भाडे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, ही घरे मेट्रो आणि रेल्वे स्थानकापासून १५ मिनिटांच्या परवडणारी घरे बांधण्याची योजना आखण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी उभारणार सिंगापूरसारखी घरे
मुंबई हे जगातील सर्वात महागडे शहर आहे. मुंबईतील नागरिक आपल्या उत्पन्नातील ५० टक्के रक्कम ही घराच्या भाड्यासाठी खर्च करतात. इतर शहरातील लोक फक्त ३० ते ३५ टक्के रक्कम घराच्या भाड्यासाठी वापरली जाते. त्यामुळेच एमएमआरच्या विकासासाठी रेंटल हाउसिंगवर विशेष लक्ष दिले जात आहे. यामुळे नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन सिंगापूरसारख्या घरांची निर्मिती केली जाणार आहे. (Mumbai News)