Monday, May 19, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Borivali National Park : बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात छावा'चे आगमन!

Borivali National Park : बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात छावा'चे आगमन!

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (Sanjay Gandhi National Park) सिंह सफारी (Lion Safari) आणि व्याघ्र सफारीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. सिंह सफारीत गुजरातहून आणलेली ‘मानस’ आणि ‘मानसी’ ही सिंहाची जोडी लोकप्रिय ठरली आहे. दरम्यान, या सफारीत आता सिंहाची नवीन जोडी दाखल झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीला नव्याने चालना मिळणार आहे.



बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गुजरात येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून आणलेली सिंहाची जोडी आता सिंह सफारीत दाखल झाली आहे. गुजरात येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून २६ जानेवारी रोजी सिंहाची ही जोडी आणण्यात आली होती. ही सिंहाची जोडी तीन वर्षांची आहे. काही दिवस या जोडीला निरिक्षण कक्षात ठेवण्यात आले होते. आता ही जोडी सिंह सफारीत दाखल झाली आहे. त्यामुळे यापुढे पर्यटकांना सिंहाची नवी जोडीही पाहता येणार आहे. (Lion Safari)


काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय उद्यानातील मानसीने एका छाव्याला जन्म दिला. ‘मानस’ आणि ‘मानसी’ सिंहाची ही जोडी २०२२ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली होती. मात्र, त्या जोडीचे मिलन होत नव्हते. मागील वर्षी उद्यानातील पथकाने मानसी आणि मानस यांच्या मिलनासाठी प्रयत्न सुरु केले होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २००९ मध्ये रवींद्र आणि शोभा ही सिंहाची जोडी आणण्यात आली होती. शोभा सिंहिणीने २०११ मध्ये दोन माद्या आणि एक नर छाव्याला जन्म दिला. ‘लिटिल शोभा’, जेस्पा आणि गोपा हे या जोडीचे छावे. सिंहाचे हे कुटुंब गेली अनेक वर्षे पर्यटकांसाठी आकर्षण ठरले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी शोभाचा मृत्यू झाला. त्यानंतर २०२१ मध्ये गोपाचा मृत्यू झाला. तर २०२२ मध्ये रविंद्र आणि जेस्पा यांचाही मृत्यू झाला.


अनेक वर्षे राष्ट्रीय उद्यानातील अविभाज्य भाग असलेले सिंहांचे कुटुंब निवर्तल्यानंतर २०२२ मध्ये गुजरातमधून ‘मानस’ आणि ‘मानसी’ या सिंहांच्या जोडीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. मागील वर्षी उद्यानातील पथकाने मानसी आणि मानस यांच्या मिलनासाठी प्रयत्न सुरु केले होते. काही दिवसांपूर्वी या जोडीने एका छाव्याला जन्म दिला आहे. आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंहाची एकूण संख्या ५ झाली आहे. त्यातील मानस आणि मानसीचा छावा वगळता बाकी चार सिंह सफारीमध्ये पाहता येतील. (Borivali National Park)

Comments
Add Comment