Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीसंजय पडते यांचा उबाठा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

संजय पडते यांचा उबाठा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

आंगणेवाडी यात्रेनंतर ठरविणार पुढची भूमिका

उबाठातील अंतर्गत घडामोडीना कंटाळून राजीनामा

बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत राहणार

सिंधुदुर्ग : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. आज कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय पडते यांनी याची घोषणा केली. सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चाललेल्या घडामोडी पाहता काम करणे अशक्य असल्याने राजीनामा देत असल्याचं पडते यांनी सांगितलं.

आपली पुढील भूमिका आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उबाठा जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आज कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख याना दिलेले पत्र पत्रकार परिषदेत सादर केले. त्या पत्रात म्हटले आहे, मी संजय धोंडदेव पडते, जिल्हाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १९८५ सालापासून बाळसाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. आपल्याच नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद! सद्यस्थितीत सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम माझ्या हातून होईल अशी परिस्थिती नाही. आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक व निष्ठेने न्याय देण्याचे काम केले. सध्दा पक्षांतर्गत सुरु असलेल्या घडामोंडीमुळे काम करणे शक्य वाटत नाही. यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख या पदाचा राजीनामा देत आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून भविष्यात बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत राहीन. आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे. असे पडते यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे.

Minister Nitesh Rane : सिंधुदुर्गात लवकरच सुरू करणार ‘पालकमंत्री कक्ष’- मंत्री नितेश राणे

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना यांनी आता पर्यन्तचा प्रवास उलगडून सांगितला. ते म्हणाले, १९८५ सालापासून शिवसेनेचा साधा शिवसैनिक ते शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख अशी अनेक पदे या शिवसेनेच्या माध्यमातून मिळाली. शिवसेनेच्या धोरणाप्रमाणे ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ करत या जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख वसंतराव केसरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी या जिल्ह्यांमध्ये शिवसेना गावा गावात उभी करण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जिल्ह्यामध्ये केले. अनेक गावात शिवसेना शाखा काढून आम्ही समाजपयोगी कार्यक्रम करून शिवसेना वाढवली.

त्यानंतर या जिल्ह्यामध्ये विद्यमान खासदार माजी मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या जिल्ह्यामध्ये शिवसेना पदासाठी प्रयत्न करून शिवसेना वाढवली. शिवसेना वाढवल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती, बांधकाम सभापती अशी अनेक पदे या शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर परत एकदा मध्ये मी शिवसेनेमध्ये आलो. शिवसेनेमध्ये आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी काम केले. जिल्हाप्रमुख म्हणून सुद्धा या जिल्ह्यांमध्ये मी काम केले.

अनेक शिवसैनिकांचे मला सहकार्य मिळाले. पण आताच्या उबाठा शिवसेनेत होत असलेल्या घडामोडी आणि या घडामोडीमुळे काम करणे शक्य नसल्याने मी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे मला या शिवसेनेत काम करताना अनेक पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. पण आता मला असे वाटायला लागले आहे की कुठेतरी आपण भविष्यात शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे आज मी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. मला सगळ्यांनी पदाधिकांनी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

पडते पुढे म्हणाले, लोकांचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी सत्तेच्या प्रवाहात राहणे गरजेचे आहे. त्यामुळे या पुढे कुठे जायचे हा निर्णय आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा झाल्यांनतर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेणार असल्याचे पडते म्हणाले. आपण बाळासाहेबांचा शिवसैनिक असून भविष्यात बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत राहीन.असे पडते यांनी शेवटी सांगितले.

यावेळी उबाठा उपविभाग उप विभागप्रमुख सचिन गावडे, काशीराम घाडी, विकास घाडी, किशोर तांबे, भास्कर गावडे, गुरुनाथ गावडे, गुरुनाथ चव्हाण, गणपत चव्हाण आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -