Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणMinister Nitesh Rane : सिंधुदुर्गात लवकरच सुरू करणार 'पालकमंत्री कक्ष'- मंत्री नितेश...

Minister Nitesh Rane : सिंधुदुर्गात लवकरच सुरू करणार ‘पालकमंत्री कक्ष’- मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग : सर्वसामान्य जनतेला त्यांच्या समस्या मांडण्यासाठी सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच लवकरच ‘पालकमंत्री कक्ष’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.

Canda News : कॅनडा विमानतळावर लँण्डिंगदरम्यान विमान उलटले, १७ जण जखमी

जिल्हा प्रशासकीय पातळीवर सर्वसामान्यांना आपले विषय मार्गी लावता यावे यासाठी पालकमंत्री नितेश राणे लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ पालकमंत्री कक्ष स्थापन करणार आहे. या पालकमंत्री कक्षात पालकमंत्री स्वतः जनतेचे प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी उपस्थित असणार आहेत. यासाठीची जागाही निश्चित करण्यात आली आहे. तसेच जनता दरबाराच्या अनुषंगाने पालकमंत्री जनतेची थेट भेट घेत त्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावणार आहेत. सामान्य जनतेला प्रशासकीय पातळीवर कोणताही त्रास होऊ नये, यादृष्टीने पालकमंत्र्यांनी ही पावले उचलली आहेत.

जिल्हा प्रशासकीय पातळीवर सर्वसामान्य जनतेचे अनेक विषय असतात. अनेकदा त्यांना प्रशासकीय पातळीवर खेपा माराव्या लागतात. काहीवेळा विषय मार्गी लागण्यास अडचणीही येतात. अशावेळी सर्वसामान्यांना आपले विषय मार्गी लावण्याच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी आता लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच पालकमंत्री कक्ष स्थापन होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा मोठा लाभ होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -