Friday, May 9, 2025

कोकणब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीसिंधुदुर्ग

INS Guldar : विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आयएनएस गुलदार युद्धनौका

INS Guldar : विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आयएनएस गुलदार युद्धनौका

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गवासियांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आयएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी याची घोषणा केली आहे. ही नौका सर्वसामान्यांसाठी सुरु होणार आहे.




सिंधुदुर्गात वसलेल्या विजयदुर्ग बंदरात आयएनएस गुलदार ही युद्धनौका दाखल होणार आहे. त्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून विजयदुर्गवासीयांनी मंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांना या नौकेला विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे मंत्री नितेश राणे यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार केलेल्या प्रयत्नांमुळे ही नौका विजयदुर्ग बंदरासाठी मिळवण्यात यश आले आहे.



भारतीय नौदलाचे आयएनएस गुलजार हे केवळ युद्धनौका नसून, सागरी संरक्षण, सामरिक सामर्थ्य आणि मानवतावादी सेवांचे एक प्रेरणादायी प्रतीक आहे. लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात दाखल होईल, ज्यामुळे या ऐतिहासिक ठिकाणाचे महत्त्व आणखी वाढेल. विशेष म्हणजे ही नौका सर्वसामान्यांसाठी देखील खुली होणार आहे. यामुळे सिंधुदुर्गमधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment