Sunday, September 14, 2025

ज्ञानेश कुमार देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त, पंतप्रधानांच्या नेतृत्वातील बैठकीत निर्णय

ज्ञानेश कुमार देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त, पंतप्रधानांच्या नेतृत्वातील बैठकीत निर्णय

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुढील सीईसी म्हणून नियुक्तीसाठी कायदा मंत्रालयाने अधिसूचनाही जारी केली आहे.

१९८८च्या बॅचचे केरळ केडरचे आयएएस अधिकारी गेल्या वर्षी मार्चपासून निवडणूक आयुक्त म्हणून काम कर आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवृत्त झाल्यानंतर ते पदभार स्वीकारतील. १८ फेब्रुवारीला राजीव कुमार निवृत्त होत आहे.

देशाच्या नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावावर विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एक बैठक झाली. नॉर्थ ब्लॉकमध्ये झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ मंगळवारी संपत आहे.

जुन्या व्यवस्थेनुसार, तीन सदस्यीय निवडणूक आयोगातील सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्ताला मुख्य निवडणूक आयुक्त बनवले जात असे. तथापि, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित कायद्यानुसार, आता नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड एका समितीद्वारे केली जाईल. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि पदाच्या शर्ती) कायदा, 2023 अंतर्गत, नवीन मुख्य निवडणूक आयुक्त हे सध्या आयोगात समाविष्ट असलेल्या निवडणूक आयुक्तांपैकी एक असू शकतात किंवा नवीन नाव ठरवता येते.

या कायद्याअंतर्गत, केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शोध समिती पाच उमेदवारांची यादी तयार करते. सध्या अर्जुन राम मेघवाल हे कायदा आणि न्याय मंत्री आहेत. त्यानंतर पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेल्या कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असलेल्या निवड समितीद्वारे ही यादी विचारात घेतली जाते. जर एकमत झाले नाही तर समिती बहुमताच्या आधारे नाव ठरवते
Comments
Add Comment