Monday, May 12, 2025

ताज्या घडामोडीसिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले चिपी विमानतळावर स्वागत!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले चिपी विमानतळावर स्वागत!

कणकवली : भाजपा नेते,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांचे चिपी विमानतळावर स्वागत केले.


माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देवगड येथील कृतज्ञता सोहळा कार्यक्रमासाठी मंत्री नितीन गडकरी यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले आहे. त्यांचे स्वागत मंत्री नितेश राणे यांनी केले.



यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच भाजपा पक्षाचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Add Comment