मुंबई: ब्लूबेरीला अनेकदा सुपरफूड असे म्हणतात. ही दिसायला खूप लहान दिसते मात्र त्यात पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते जे शरीरासाठी अतिशय गरजेचे असते. ब्लू बेरीचे सेवन केल्याने आपण अनेक आजारांपासून वाचतो तसेच स्किनही सुंदर होते.
ब्लड शुगर कमी करण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, एनर्जी वाढवण्यासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी ब्लू बेरीचा फायदा होतो. ब्लू बेरी गोड, पौष्टिक आणि अतिशय लोकप्रिय आहे. यात कॅलरीज कमी आणि पोषकतत्वे अधि असता. ये
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो
ब्लू बेरी हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांसाठी चांगली आहे. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार, एक महिना नियमितपणे ब्लू बेरी खाल्ल्याने शरीरात रक्त प्रवाह सुधारतो.
त्वचेसाठी वरदान
ब्लू बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे वय कमी होण्यास मदत होते. तसेच आजारांचा धोकाही कमी होतो. ब्लू बेरीमध्ये अनेक फळे आणि भाज्यांच्या तुलनेत अधिक अँटी ऑक्सिडंट्स असतात.
आरोग्यासाठी फायदेशीर
ब्लू बेरीमध्ये व्हिटामिन सी असते. हे इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय गरजेचे आहे. इम्युनिटी अधिक असेल तर शरीर आजारांपासून सुरक्षित राहते.