Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीTruck Accident : मनमाडला टँकरची क्रेनला धडक, दोन ठार; तीन गंभीर

Truck Accident : मनमाडला टँकरची क्रेनला धडक, दोन ठार; तीन गंभीर

मनमाड : शिवजयंती उत्सव निमित्ताने मनमाड नांदगाव महामार्गावर असलेल्या पथदीपच्या (लाईट) पोलवर हायड्रॉ(क्रेन)द्वारे झेंडे लावत असताना समोरून येणाऱ्या टँकरने क्रेनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्रथमोपचार करून मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.जखमी आणि मयताची नावे अद्याप समजली नसुन पुढील तपास पोलीस करत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आगामी १९ तारखेला शिवजयंती निमित्ताने मनमाड शहरात भरगच्च कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारी निमित्ताने सर्वत्र भगवे ध्वज लावण्याचा काम सुरू आहे. मनमाड शहरातील मनमाड नांदगाव महामार्गावर हॉटेल सह्याद्री समोर या महामार्गावरील पथदीप पोलवर क्रेंद्वारे भगवे झेंडे लावत असताना समोरून आलेल्या टॅंकरने या क्रेनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन जण गंभीर जखमी झाले अपघात इतका भीषण होता की क्रेनचा अक्षरशा चुरा झाला आहे. रात्रीचा अंधार असल्याने मदत कार्य करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली होती.

Shivjaynti Special : भारत-पाक सीमेजवळ घुमणार ‘शिवगर्जना’

मुळात राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारे ध्वज लावणे हे नियम बाह्य आहे. मात्र, परवानगी घेऊन ते लावता येऊ शकतात यासाठी पुरेशी खबरदारी घेऊन प्रॉपर सिक्युरिटी करून काम करायला हवे याशिवाय दिवसाच्या उजेडात हे काम करणे गरजेचे असतांना रात्रीच्या अंधारात हे ध्वज लावले जात होते. यात टँकर चालकांला समोरचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. यात अजून किती जण जखमी आहेत हेही अद्याप समजले नाही. यातील आतापर्यंत फक्त पाच जण समजले असुन यातील २ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन जण गँभिर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी बचाव कार्य सुरू केलं व जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील दोन जणांना डॉक्टरानी मृत घोषित केले. तर, इतर तीन गंभीर जखमींना मालेगाव येथे हलवले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -