
सोल लीडरशिप परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी ते स्कूल ऑफ अल्टीमेट लीडरशिपची औपचारिक घोषणा देखील करतील. हे एक प्रमुख, खाजगी वित्तपुरवठ्यावर चालवले जाणार असलेले नेतृत्व संस्थान आहे. समान विचारधारा असलेल्या व्यक्तींनी याची स्थापना केली आहे. यामध्ये एमिरेट्स, टोरेंट ग्रुपचे अध्यक्ष सुधीर मेहता, एचडीएफसी लिमिटेडचे माजी अध्यक्ष दीपक पारेख, सन फार्मास्युटिकल्सचे एमडी दिलीप संघवी, झायडस लाईफसायन्सेस लिमिटेडचे अध्यक्ष पंकज पटेल, जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आणि कोटक महिंद्रा बँकेचे नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक उदय कोटक यांचा समावेश आहे. सोल लीडरशिप परिषदेचे उद्घाटन 'नेतृत्वाकडे' पाहण्याच्या आणि त्याविषयी चर्चा करण्याच्या पद्धतीला आकार देणारा एक ऐतिहासिक कार्यक्रम ठरेल.
उज्ज्वल व अधिक समावेशी भविष्यासाठी उद्देश
या दोन दिवसांमध्ये दिग्गज नेत्यांमध्ये नेतृत्वाविषयी चर्चा आणि माहितीपूर्ण सत्रे होतील, जे त्यांचे यशापयशाचे व्यक्तिगत अनुभव सर्वांसमोर मांडतील. आवड जागवणे, पारंपरिक समजुतींना आव्हान देणे आणि नेत्यांच्या पुढील पिढीला साहसी विचार करण्यासाठी सक्षम करणे व अधिक उज्ज्वल व अधिक समावेशी भविष्यासाठी एक उद्देश घेऊन काम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.