मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग ५, ठाणे- भिवंडी- कल्याण या प्रकल्पामध्ये स्थापत्य कामाच्या खर्चात सद्या तरी कोणतीही वाढ झाली नसली तरी ३ वर्षांची प्रकल्प दिरंगाई हा त्रासदायक आहे. आरटीआयच्या माध्यमातून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केलेल्या या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरता यावर प्रकाश टाकला आहे.
MHADA Home : दक्षिण मुंबईतील १३ हजार इमारतींचा पुनर्विकास करण्यास म्हाडा सज्ज
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे विविध माहिती विचारली होती. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने अनिल गलगली यांस सविस्तर माहिती दिली. मुंबई मेट्रो मार्ग- ५ ठाणे- भिवंडी- कल्याणचे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला १ सप्टेंबर २०१९ रोजी देण्यात आले होते. मुंबई मेट्रो मार्ग- ५ ठाणे- भिवंडी- कल्याण ठाणे हा १५ स्थानके असलेला २४.९० किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. सदर काम १ मार्च २०२२ रोजी पूर्ण करणे अपेक्षित होते. आता नवीन डेडलाईन ही ३१ मार्च २०२५ अशी आहे.