Tuesday, May 20, 2025

ताज्या घडामोडीसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणेंचा उबाठा सेनेला जोरदार धक्का; शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपात

सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणेंचा उबाठा सेनेला जोरदार धक्का; शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपात

कणकवली : भाजपा संघटन पर्व अभियान निमित्ताने मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी उबाठा पक्षाला मोठे खिंडारं पाडले. मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते भाजपा पक्षात प्रवेश करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा पक्ष संघटन मजबूत होत आहे. आज मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केलेल्या सर्वांचे मंत्री नितेश राणे यांनी स्वागत केले.



उबाठा सेनेचे रामदास विखाळे यांच्यासह माजी जि प सदस्य स्वरूपा विखाळे, कलमठ गावातील ग्रामपंचायत सदस्य, वैभववाडीतील उबाठा सेनेचे दिगंबर पाटील, बिडवाडी उपसरपंच सुदाम तेली, बेळणे खुर्द गावचे सरपंच अविनाश गिरकर, कणकवली शहरातील प्रद्युम मुंज यांच्यासह उबाठा सेनेचे युवा कार्यकर्ते, आयनल गावातील उपतालुकाप्रमुख, सोसायटी चेअरमन यांच्यासह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला.


Comments
Add Comment