Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसिंधुदुर्ग

Kokan Hearted Girl Wedding : कोकण हार्टेर्ड गर्लच्या लग्नाला मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Kokan Hearted Girl Wedding : कोकण हार्टेर्ड गर्लच्या लग्नाला मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

सिंधुदुर्ग : बिग बॉस फेम कोकण हार्टेर्ड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर काल ( दि १६ ) लग्नबंधनात अडकली आहे. मराठी सिनेविश्वातील संगीतकार कुणाल भगत सोबत अंकिताची लग्नगाठ बांधली गेली आहे. अंकिताच्या लग्नाला सिनेविश्वातील कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने हजेरी लावली होती.






अंकिता आणि कुणालच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्याला मनोरंजन विश्वातील कलाकारांसोबत नेते मंडळींनी देखील आशीर्वाद दिले आहे.



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावलमध्ये असणाऱ्या 'लक्ष्मीनारायण मंदिरा'त या दोघांची लग्नगाठ बांधली गेली आहे. या शाही सोहळ्याला विद्यमान आमदार व कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावत या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मंत्री नितेश राणे यांनी या नवदाम्पत्यासोबत फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.




 










View this post on Instagram























 

A post shared by Nitesh Rane (@nitesh.rane23)





'सिंधुदुर्गाची सुकन्या ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यास पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.' अशी मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहली आहे. दरम्यान अंकिताच्या आणि कुणालच्या शाही लग्नसोहळ्याची सर्वत्र सुरु आहे.

Comments
Add Comment