ठाणे : दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. आपले व्हिडिओ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ईमेल [email protected] या ईमेलवर अथवा ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या [email protected] पाठवावेत. तरी, ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ या उपक्रमात सहभागी व्हावे व आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळवावी, असे आवहन ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले आहे.
मराठीचा ‘ऑनलाईन जागर’ !
