Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Maharashtra News : सुट्टी सिगारेट, बिडी विकण्यास महाराष्ट्रात आरोग्य विभागाची बंदी!

Maharashtra News : सुट्टी सिगारेट, बिडी विकण्यास महाराष्ट्रात आरोग्य विभागाची बंदी!

शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, धार्मिक स्थळांच्या १०० मीटर परिसरात विक्री बंदी लागू

मुंबई  : महाराष्ट्रात जेव्हा कोरोना वेगाने पसरत होता तेव्हा आरोग्य विभागाने राज्यातील कोणत्याही पान बिडी दुकानात सुट्टी सिगारेट व बिडी विकायला बंदी घातली होती. त्यानंतर राज्यात काही साथरोग आले. आता जीबीएसने धुमाखूळ घातला आहे मात्र आरोग्यविभागाच्या या आदेशाची असून पोलीस व महापालिका व खुद्द आरोग्य विभागाकडूनच कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. महाराष्ट्रात शाळा – कॉलेजमधील तरुणाई मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे सिगारेट पासून गुटख्याच्या अहारी गेले आहे. वेळोवेळी राज्यातील अनेक सरकारांनी दारुबंदी, सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी अनेकदा बैठका घेतल्या आहेत.

आरोग्य विभागाने यापूर्वी सुट्टी सिगारेट व बिडीची विक्री होऊ नये यासाठी विधी व कायदा विभागासह सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र विधी विभागाकडून पुरेसे पाठबळ न मिळाल्याने आरोग्य विभागाला याबाबत आदेश काढता आला नव्हता, असे आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यानच्या शाळी- महाविद्यालये तसेच रुग्णालये व धार्मिक स्थळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी लागू करण्यात आली. मात्र त्याचीही ठोस अंमलबजावणी आजपर्यंत कोणताही संबंधित विभागाने केलेली नाही.

यातील सर्वात महत्वाचे म्हणजे याबाबतच्या केंद्राच्या कायद्याचे पालन महाराष्ट्रात कायदा अस्तित्वात आल्यापासून कधीच करण्यात आले नाही. ‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३’ या अंतर्गत सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतेवेळी पाकिटाच्या ८५ टक्के भागावर सिगारेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश स्पष्ट शब्दात छापणे बंधनकारक आहे. सिगारेट पाकिट अथवा बीडी बंडलाची विक्री केल्यास कायद्यात अपेक्षित असलेला उद्देश म्हणजे ‘आरोग्याच्या धोक्याची कल्पना’ हा साध्य होतो.

Comments
Add Comment