
मुंबई : महाराष्ट्राच्या मुंबईत मराठी भाषेच्या अवमान घडण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांमध्ये वाढत आहे. मराठी भाषा आणि मराठी व्यक्तींचा द्वेष करण्याचे प्रकार मराठी माणसांच्या मुंबईत घडत आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये असा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर डोंबिवलीत असा प्रकार समोर आला.

मुंबई : मुंबईमध्ये आठ ते दहा दशके जुन्या असलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या समूह पुनर्विकास याकडे म्हाडाने आता विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या ...
आता मुंबईतील क्रोफर्ड मार्केट भागात मराठी भाषेला विरोध करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर संबंधित तरुणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शोरूम गाठत मॅनेजरला धडा शिकवला. त्याला मराठीतून माफी मागायला लावली. या प्रकरणाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबईतील क्रोफर्ड मार्केट भागात रुपम शोरूम आहे. या शोरूममध्ये असलेल्या मॅनेजरने एका मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्याची जबरदस्ती केली. तसेच मी देखील मराठीत बोलणार नाही, असे तो मॅनेजर त्याला सांगू लागला. त्यानंतर या तरुणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्याकडे तक्रार केली.