Wednesday, July 9, 2025

कर्जत रेल्वे फलाटावरील सरकते जिने सुरू

कर्जत रेल्वे फलाटावरील सरकते जिने सुरू
कर्जत (वार्ताहर) : कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवरील मुंबईकडील सरकत्या जिन्यांचे काम पूर्ण झाले असून हे दोन्ही जिने सुरू करण्यात आले आहेत. या जिन्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग तसेच महिला प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. खरे तर हे दोन्ही जिने २७ जानेवारीला सुरू होणार होते; परंतु काम पूर्ण न झाल्याने तो मुहूर्त टाळला होता.

कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोनवर रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी सरकता जिना उपलब्ध करून दिला आहे. तसेच फलाट क्रमांक एक वर सुद्धा एक चढण्यासाठी व एक उतरण्यासाठी अशा दोन सरकत्या जिन्यांचे काम काही महिन्यांपासून सुरू होते. या सरकत्या जिन्याचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. ते कधी पूर्ण होणार आणि त्याचा उपयोग कधी होणार असा प्रश्न प्रवासी वर्ग उपस्थित करीत आहे. याबाबत कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना सदर दोन्ही सरकत्या जिन्यांचे काम प्रगती पथावर आहे. हे सरकते जिने २७ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू होण्याचे शक्यता आहे. असे लेखी कळविले आहे; परंतु काम पूर्ण न झाल्याने २७ तारखेचा मुहूर्त टळला होता.

त्यांनतर ओसवाल यांनी आपला पाठपुरावा सुरूच ठेवला. हे जिने कधी सुरू होणार असे विचारले असता काम पूर्ण झाल्यावर कधीही सुरू होतील. असे मोघम उत्तर दिले. ते उत्तर ओसवाल यांच्या पर्यंत पोहोचता पोहोचता हे दोन्ही जिने सुरु सुद्धा करण्यात आले. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाचा समन्वयाचा अभाव दिसून आला. हे जिने सुरू झाल्याने ज्येष्ठ नागरिक, अपंग तसेच महिला प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >