उरण : सिडकोने नव्याने विकसित केलेल्या उलवे नोड परिसरात तीन नायजेरीयन नागरीकांकडून १ कोटी १० लाख १० हजार ५०० रुपये किमतीचे मादक पदार्थ जप्त केले आहेत. उलवे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्यावर एनडीसीपी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून त्या तीन नायजेरीयन नागरीकांना अटक केली असून त्यांच्याकडून रू ५९ लाख २४ हजार रुपये किमतीचा पांढर्या रंगाची पावडर असलेला ११८.४८ ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन हा अमली पदार्थ, रू.५० लाख ४२ हजार किमतीचा ब्राऊन रंगाची क्रिस्टल पावडर असलेला १००.८४ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अमली पदार्थ, रू.१००० किमतीचा छोटा इलेक्ट्रॉनिक काटा आणि ४३ हजार ५०० रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
नायजेरियन्सकडून १ कोटींचे ड्रग्ज जप्त
