मुंबई : १७ फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून फास्टॅग(FASTag) साठी नवीन नियम लागू होत आहेत. याबाबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशन नियम जाहीर केले आहेत, जे १७ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होणार आहे. नव्या नियमांनुसारफास्टॅग व्हाइटलिस्टेड (सक्रिय), ब्लॅकलिस्टेड (निष्क्रिय) असेल.
अशात जर फास्टॅगमध्ये अपुरा बॅलन्स, KYC झाली नसेल किंवा वाहन नोंदणी तपशीलांमध्ये तफावत आढळली तर तो ब्लॅकलिस्टेड केला जाईल. नवीन नियमांनुसार, जर तुमचे वाहन टोल बूथवर पोहोचण्यापूर्वी फास्टॅग ६० मिनिटांपेक्षा जास्त काळ ब्लॅकलिस्ट केला गेला असेल तर तो शेवटच्या क्षणी रिचार्ज करता येणार नाही. पण, टॅग स्कॅन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर१० मिनिटांच्या आत टॅग रिचार्ज केल्यास युजरला टोल शुल्क भरता येणार आहे. अशा परिस्थितीत दंड टाळता येणार आहे.
एनपीसीआयच्या २८ जानेवारी रोजीच्या परिपत्रकानुसार, टोल प्लाझावर टॅग स्कॅन झाल्यानंतरच्या विशिष्ट वेळेत आता फास्टॅग व्यवहार वैध केले जातील. यासाठी दोन अटी लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये टॅग स्कॅन करण्यापूर्वी ६० मिनिटे आणि टॅग स्कॅन केल्यानंतर १० मिनिटे अशा दोन अटींचा समावेश आहे. जर टोल प्लाझावर पोहोचण्यापूर्वी एका तासापेक्षा जास्त काळ फास्टॅग ब्लॅकलिस्टेड, हॉटलिस्टेड किंवा त्यामध्ये कमी बॅलन्स असेल, तर शुल्क नाकारले जाईल आणि जर टॅग स्कॅन केल्यानंतरही १० मिनिटांपर्यंत निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्टेड राहिला तरीदेखील शुल्क नाकारले जाईल. अशा परिस्थितीत सिस्टम एरर कोड १७६ दाखवले आणि युजरकडून दंड म्हणून टोल शुल्काच्या दुप्पट रक्कम आकारली जाईल.
फास्टॅग युजर्सनी दंड टाळण्यासाठी लांबच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी प्रवाशांना फास्टॅग खात्यात पुरेसा बॅलन्स शिल्लक ठेवावा लागणार आहे.ब्लॅकलिस्टिंग टाळण्यासाठी प्रवाशांना केवायसी तपशील नियमितपणे अपडेट करावी लागणार आहे.टोल प्लाझावर पोहोचण्यापूर्वी प्रवाशांना फास्टॅगमध्ये किती बॅलेन्स आहे, तो सक्रिय आहे की नाही हे तपासावे लागणार आहे.या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास युजर्सना अनावश्यक दंड टाळता येणार आहे.