पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गुरुवारी रात्री उशिरा व्हाईट हाऊसमध्ये काल अत्यत महत्त्वाची चर्चा झाली. त्यात अनेक मुद्यांना स्पर्श केला गेला आणि ट्रम्प यांनी भारताला अत्यंत महत्त्वाची भेट दिल्याची घोषणा केली. त्यानुसार तहव्वूर राणा या दहशतवाद्याला भारताच्या हवाली करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय दहशतवादाची झळ भारताला सर्वात जास्त बसली आहे आणि त्यावर भारताला अमेरिकेकडून मिळालेली ही महत्त्वपूर्ण भेट आहे असे म्हणावे लागेल. दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मोदी यांची अमेरिकेला ही पहिलीच भेट होती. त्यात पाच महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. त्यापैकी पहिला होता की, तहव्वूर राणा याला भारताच्या हवाली करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे भारत आणि अमेरिका इस्लामी दहशतवादाविरोधात एकत्रित लढणार आहेत. आशिया पॅसिफिक महासागरासाठी दोन्ही देशांनी महत्त्वाची भूमिका बजावण्याचे ठरवले आहे. कारण याच दोन देशांसह जपान आदी देशांनी चीन विरोधात आघाडी उघजली आहे. त्यामुळे ही आघाडी मजबूत होण्यावर भर दिला आहे ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. भारतासह सरक्षण व्यवसाय मजबूत करण्यावर भारत आणि अमेरिका जोर देणार आहेत. ही भारतासाठी अत्यत महत्त्वाची आहे कारण भारताचा संरक्षण व्यवसाय अधिक मजबूत झाला तरच भारताला पाकिस्तान आणि तत्सम देशांकडून असलेला धोका कमी होणार आहे. याशिवाय अत्यंत महत्त्वाची घोषणा अमेरिकेने केली आहे ती म्हणजे भारताला तेल आणि ऊर्जा पुरवठा करण्यावर सहमती दिली आहे. भारतासोबत व्यापारी तूट कमी करण्यावर अमेरिकेने संमती दिली आहे.
अमेरिका भारतातील ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यांतील गुंतवणूक वाढवणार ही महत्त्वाची भूमिका आहे. कारण सध्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यांतील अमेरिकेची गुंतवणूक कमी आहे. तसेच एआय सेमीकंडक्टर आणि क्वांटमवर मिळून काम करणार हीही एक अमेरिकेची घोषणा आहे. पण सर्वात महत्त्वाची घोषणा केली आहे ती म्हणजे टेरिफवर. टेरिफच्या मुद्यावर प्रत्येक बाजूने चर्चा करण्यात आली आणि भारतासह धोरणात्मक भागीदारी वाढवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. मोदी यांच्या या भेटीमध्ये भारत आणि अमेरिकेने महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये त्यांचे धोरणात्मक संबंध विस्तृत करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांनी घोषणा केली की अब्जावधी डॉलर्सच्या लष्करी पुरवठ्यात वाढ करण्याचा भाग म्हणून वॉशिंग्टनने दिल्लीला एफ ३५ ही लढाऊ विमाने देण्याचा मार्ग या भेटीच्या दरम्यान मोकळा झाला आहे. ही भारतासाठी अत्यंत महत्वाची भेट आहे कारण एफ ३५ लढाऊ विमाने भारताला देण्याबाबत यापूर्वी चर्चा झाली होती. पण ती आता फलद्रूप होत आहे. त्याशिवाय दोन्ही देशांनी आपला द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचा आणि त्याहूनही जास्त करण्याचा घेतलेला निर्णय भारताच्या फायद्याचा आहे. तसाच तो अमेरिकेच्या फायद्याचाही आहे. अर्थात भारत आणि अमेरिका यांच्यातील या जवळच्या संबंधांमुळे चीनचा जळफळाट झाला आहे. चीनने अगोदरच इशारा दिला आहे की भारत अमेरिका यांनी आपल्या द्विपक्षीय व्यापारात चीनला मुद्दा बनवू नये. चीनचा जळफळाट होणे साहजिक आहे कारण भारत आणि अमेरिका यांच्यात जसा व्यापार मजबूत होईल तसे चीनचे नुकसान होणार हे उघड आहे. पण चीन काहीही म्हणत असला तरीही भारत आणि अमेरिकेने हे स्पष्ट केले आहे की कुणाही शेजाऱ्याशी आमचे कोणतेही प्रश्न असले तरीही आम्ही द्विक्षीय दृष्टिकोन स्वीकारला आहे. यामुळे चीनने आता आश्वस्त होण्यास हरकत नाही. या ढोबळ मुद्यांशिवाय उभय देशांनी काही बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतले. त्यात अमेरिकन विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्यास परवानगी देणे आणि दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे यांचा समावेश आहे.
मोदी यांनी अदानी यांच्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. तो वैयक्तिक मुद्दा आहे असे रास्त उत्तर दिले. आता या चर्चेचे विकृत स्वरूप मोदी विरोधी माध्यमे नक्कीच सादर करतील, पण त्यात मोदी आणि ट्रम्प यांना जनतेने पुन्हा निवडून दिले आहे ते त्यांची धोरणे रास्त वाटल्यामुळेच हे कसे काय विसरणार याचे उत्तर दोघाही नेत्याचे विरोधक देऊ शकणार नाहीत. मोदी यांचा हा दौरा भारतासाठी नक्कीच फायद्याचा ठरला कारण त्यात भारतासाठी अनेक लाभ होते आणि त्यातल प्रमुख लाभ होता तो म्हणजे तहव्वूर राणा याचे प्रत्यार्पण. त्यामुळे पाकिस्तान जे अनेक वर्षे अमेरिकेच्या माडींवर बसवून भारतात दहशतवाद पसरवत होते त्याचा पर्दाफाश झाला आहे. हा लाभ कसा काय नाकारणार हा प्रश्न विरोधकांना पडणार नाही. ट्रम्प यांनी मोदी इज ए टफ निगोशिएटर असे जे रास्त उद्गार काढले त्यामुळे काँग्रेससह शिवसेना उबाठा आणि विरोधकांचा जळफळाट होण्याची शक्यता आहे. पण ती वस्तुस्थिती आहे. मोदी यांचे टफ निगोशिएशन हे खरोखरच देशासाठी होते आणि त्याचे लवकरच प्रत्यंतर येईल. मोदी ट्रम्प यांच्या भेटीमुळे अनेक लाभ भारताच्या पदरात पडले आहेत आणि ते नाकारणे हे नतद्रष्ट विरोधकांना जड जात आहे. ट्रम्प यांच्या टेरिफच्या दणक्यावर मोदी यांनी चांगला उपाय शोधला आहे तो अनेक वर्षे भारतासाठी लक्षात राहील. या एकाच मोदी यांच्या करारासाठी तरी भारताने मोदी यांच्याप्रती कृतज्ञ राहायला हवे. ट्रम्प यांनी टेरिफवर मलम दिले नाही पण मोदी यांना त्यातून वाचण्यासाठी अनेक मार्ग काढून दिले आहेत. हे काय कमी झाले. अमेरिकेचे टेरिफ अस्त्र भारतासाठी मोदी संधी ठरू शकते. त्यासाठी मोदी यांचे अभिनंदन केले पाहिजे. ट्रम्प आणि मोदी यांची भेट कायमस्वरूपी चर्चेत राहील. दोन्ही देशानी घेतलेल्या आतापर्यंतच्या भूमिकांसाठी ती आणखी पुढे जाईल.