साप्ताहिक राशिभविष्य, १६ ते २२ फेब्रुवारी २०२५
![]() |
संघर्षातून यशमेष : संघर्षातून यश देणारा असा हा कालावधी राहील. सगळेच आपल्या मनाप्रमाणे होईल असे नाही. त्यासाठी अनेकवेळा संघर्ष करावा लागेल मात्र अधिक प्रयत्न केल्यास त्यात यश मिळू शकते. निराश होऊ नका. नोकरीविषयक कामे होतील. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती यशदायी ठरतील. नोकरीसाठी बोलावणं येईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. महत्त्वाची सरकारी कामे हातावेगळी करण्यात यश मिळेल. जमीनजुमला, संपत्ती याविषयीचे प्रश्न सुटतील. जीवनसाथीची चांगली साथ मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळाल्यामुळे समाधान मिळेल. तसेच गुरुजनांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय धंद्यात नवीन बदल व्यवसायास पोषक ठरतील. |
![]() |
भरभराट होईलवृषभ : आपण घेतलेले निर्णय योग्यवेळी आणि अचूक ठरल्याने हातातील नियोजित कामे अथवा दीर्घकाळ रखडलेली कामे मूर्त स्वरूपात आपल्यासमोर आल्यामुळे आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल. रोजच्या कामामध्ये गतिशीलता येऊन कामे वेगाने पार पाडाल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होईल. काही नवीन व्यावसायिक अनुबंध जुळून येण्याची शक्यता आहे.नवीन मार्ग सापडतील. व्यवसायात भरभराट होईल. आरोग्यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी संधी चालून येतील. त्या त्याबाबतीत गुरुजन तसेच कुटुंबाचे मार्गदर्शन व मदत मिळेल. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. |
![]() |
आशीर्वाद लाभतीलमिथुन : या आठवड्यात भाग्याची साथ लाभल्याने आपल्या समोरील कामे आपण अडथळ्याविना करू शकाल. विशेषतः दीर्घकाळ रखडलेली सरकारी स्वरूपाची कामे तसेच कायदेविषयक कामे होतील. कामे पूर्ण करण्यासाठी अपेक्षित मदत सुद्धा मिळू शकते. प्रवासाचे योग आहेत. सहकुटुंब सहपरिवार अथवा मित्रमंडळींच्या समवेत पर्यटनासाठी जवळचे तसेच दूरचे प्रवास होऊ शकतात. प्रवास कार्य सिद्ध राहतील. मन प्रफुल्लित राहील. नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल. आपण पूर्वी केलेल्या कामाचे कौतुक होऊन आपण प्रशंसेस पात्र ठराल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल. कुटुंबातील मुलामुलींना अनपेक्षितरीत्या चांगले यश मिळेल. |
![]() |
अनुकूल बदल अनुभवण्यास मिळतीलकर्क : कामाचा व्याप वाढल्यामुळे कार्यक्षेत्र वाढेल. त्यामुळे थोडी दगदग वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. बेपर्वाई नको. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. रोजच्या कामात तसेच आपल्या कार्यालयीन कामकाजामध्ये थोडी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. मतभेदाचे प्रसंग युक्तीने हाताळा. इतरांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेऊन आपले मत व्यक्त करा. शांतपणे निर्णय घ्या. वेळेचे नियोजन करणे फायद्याचे ठरेल. तसेच कामाच्या स्वरूपात सुद्धा बदल होऊ शकतो; परंतु काही अनुकूल बदल नोकरीमध्ये अनुभवण्यास मिळतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. सहकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. |
![]() |
आर्थिक बाजू भक्कम राहीलसिंह : आपले परिचित, मित्र मंडळी यांच्या भेटीगाठी होतील. महत्त्वाच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात याल. त्यांच्याकडून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन लाभू शकते. दीर्घकाळ रखडलेली कामे गतिमान करण्यात यश प्राप्त होईल. व्यवसाय धंद्यामध्ये आर्थिक प्राप्ती चांगली राहील. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करण्याची गरज आहे. मदत उपलब्ध होईल. आर्थिक बाजू भक्कम राहील. आरोग्य चांगले राहील. रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. अनेक कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल. तरुण-तरुणींचा नोकरी विषयक प्रश्न मिटेल. |
![]() |
व्यवहार गतिशील होतीलकन्या : थोडी आर्थिक चणचण भासली तरी सप्ताह यशदायी असेल. काही महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यश मिळेल. विशेषता स्थायी संपत्ती विषयीचे थांबलेले व्यवहार गतिशील होतील. समाजातील थोरा-मोठ्यांचे मार्गदर्शन लाभू शकते. कलाकारांच्या कलेला वाव मिळून आपले कर्तुत्व अथवा कला सिद्ध करण्याच्या संधी लाभतील. मानसन्मान मिळेल. त्याचप्रमाणे आर्थिक प्राप्ती ही वाढू शकते. मात्र कामकाजाचे वेळापत्रक सांभाळावे लागेल. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. |
![]() |
कार्यमग्न राहातूळ : या आठवड्यात आपण रखडलेली किंवा अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करू शकाल. कुटुंब परिवारात काही कार्य ठरल्याने रोजच्या पेक्षा जास्त काम करावे लागतील. स्थावर बाबतचे प्रश्न सोडविता येतील. वडिलोपार्जित संपत्ती अथवा राहत्या घराबद्दलचा प्रश्न मिटेल. काही वेळेस ठरलेल्या नियोजनात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने निराश न होता आपल्या कार्याविषयी कार्यमग्न रहा. कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ व्यतीत होईल. व्यवसाय-धंद्यात कार्यक्षेत्र विस्तार झाल्यामुळे कामाचा व्याप वाढून जास्तीचे काम करावे लागेल. त्यासाठी वेळेचे नियोजन करणे आवश्यक ठरेल. आर्थिक बाजू ठीक राहील. |
![]() |
अट्टहास ठेवू नकावृश्चिक : रोजच्या जीवनात थोडे मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे शांत राहून ताण-तणावापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक राहील. तसेच समोरच्या व्यक्तीचे पूर्णपणे मत ऐकून घेऊन मग त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करा. स्वतःच्या मताचा अट्टाहास ठेवू नका. कुटुंबामध्ये लहानसहान गोष्टींवरून वाद-विवाद टाळणे हिताचे ठरेल. कुटुंबातली शांतता टिकवून ठेवा. नातेवाईक, आप्तेष्ट, कुटुंबातील सदस्य यांच्याबरोबर काही वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. नात्यांना महत्व द्या. प्रसंग टाळता येतील. |
![]() |
मेहनतीचे चीज होऊ शकते
|
![]() |
यश चकीत करेलमकर : आपल्या मनातील केलेल्या नियोजनात प्रयत्नांद्वारे मिळालेले यश चकीत करेल. आपल्या मनातील अपेक्षित गोष्टी साध्य होतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचे तसेच हाताखालील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळत राहील. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता. सरकारी नोकरीमध्ये बदल घडू शकतो. अतिरिक्त कार्यभार सोपविला जाऊ शकतो. त्याचबरोबर बदलीची शक्यता. बदली अपेक्षित जागी होईल; परंतु आपल्या अधिकारांच्या मर्यादेची जाण ठेवणे आवश्यक आहे. लहान मोठी प्रलोभने टाळा. चालू नोकरी बदलण्याच्या प्रयत्नात असाल, तर त्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांना यश मिळू शकते. तसेच पूर्वी दिलेल्या नोकरी विषयक मुलाखती यशस्वी झालेल्या आढळतील. |
![]() |
महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्याकुंभ : या आठवड्यात आपल्या दैनंदिन कामकाजात व्यग्र राहणार आहात. नोकरी, व्यवसाय धंद्यामध्ये कार्यक्षेत्र विस्तारामुळे व अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कामामध्ये ताण जाणवेल. काही वेळेस अनपेक्षित समस्या, अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे परंतु येणाऱ्या अडचणीतून मार्ग निघू शकेल. आपले डोके शांत ठेवा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या चुका काढू नका. कोणतेही महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. स्वतःच्या बोलण्यावर व वागणुकीवर नियंत्रण आवश्यक आहे. कुटुंबातल्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता. खर्चामध्ये झालेली वाढ आश्चर्यचकित करेल. विशेषतः मुलांच्या शिक्षणाबाबत. प्रकृतीस्वास्थ्य ठीक राहील. नोकरीमध्ये आपण पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल. जीवनसाथी साथ देईल. |
![]() |
कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधीमीन : भौतिक क्षेत्रात यश मिळत राहील पण मिळणाऱ्या यशाने हुरळून जाऊ नका. आपल्या जबाबदारीचे व कर्तव्याचे भान ठेवून आपल्या वागणुकीवर व बोलण्यावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या मताला प्राधान्य देणे हितकारक ठरेल. तसेच कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नका. दीर्घकाळ रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यश मिळेल. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. कलाक्षेत्राला उत्तम काळ आहे. काही भाग्यवंतांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. क्रीडा व राजकीय क्षेत्रातील जातकांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करावे. |