Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीसुरेश धस, धनंजय मुंडे यांच्यात मनभेद नाहीत - चंद्रशेखर बावनकुळे

सुरेश धस, धनंजय मुंडे यांच्यात मनभेद नाहीत – चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक: सुरेश धस व धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीचे समर्थन केले आहे. दोघांमध्ये अनेक बाबींमध्ये मतभेद नक्कीच आहेत, परंतु कोणतेही मनभेद नाहीत. दोघांनी मिळून काम केले तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो अशी आमची भूमिका आहे. सरपंच देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशी झाली पाहिजे , अशी मुंडे यांच्यासह सर्वांचीच मागणी आजही कायम असून,

या भेटीचा चुकीचा अर्थ काढू नये असे आवाहन भाजपचे प्रदेश अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नाशिक दौऱ्यावर आले असता बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, भाजपने आमदार सुरेश धस यांना शांत राहा असे केव्हाच सांगितले नाही. उलट त्यांनी व धनंजय मुंडे यांनी एकत्र काम केले तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो. ७ जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद साधला आहे. १ कोटी ५१ लाख प्राथमिक सभासद नोंदणी टारगेट आहे. त्यात १ कोटी १४ लाख प्राथमिक सदस्य नोंदणी झाली आहे. ३ लाख सक्रिय सभासद पक्ष पदाधिकारी आहेत.

महाराष्ट्रात आगामी सर्व निवडणूका महायुतीत एकत्र लढणार आहेत. विधान सभा निवडणुकीत दिलेला विकसित महाराष्ट्र जाहिरनामा पूर्ण करणार आहे. राज्य सरकार कोणत्याही योजना बंद करणार नाहीत. या उलट केंद्र आणि राज्य मिळून ४७ योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोत. भारतीय जनता पक्ष कमजोर असलेल्या ठिकाणी इतर पक्षातील उमेदवारांना पक्षप्रवेश देत आहे. मात्र जून्या कार्यकर्त्यांना न्याय देणार आहे. महाराष्ट्रातील लव्ह जिहाद कायदा सर्वाधिक कडक कायदा फडणवीस करणार आहे. ६३ लोकनियुक्त सरपंच ४०० ते ४५० विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवेश केला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

दहा बारा दिवसात पालकमंत्री तिढा सुटेल

पालकमंत्री पद हे भौगोलिक परिस्थिती नुसार ठरत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.नाशिक आणि रायगड पालक मंत्री पदाचा तिढा दहा बारा दिवसात सुटेल. तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित दिवसात बसून निर्णय घेऊ. आमच्यात कोठेही संघर्ष नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. नाशिकला येत्या काळात मंत्रीपद देण्यात येईल असेही स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -