सेवापूर्तीचा कृतज्ञतेचा. कार्य साफल्याचा. ज्या ऑफिसने आयुष्यभर रोजी रोटी दिली, साथ दिली, सन्मान दिला. कुटुंबाला सावरता आलं. स्वतःला मिरवता आलं. केवळ त्या नोकरीला आज पूर्णविराम द्यावा. मनाची चंचलता, चल बीचलता वाढली. मनाची अस्वस्थता वाढली. पुढे काय? उद्यापासून नवेपण जगण्याचा, वागण्यात, दिनचर्येत सर्वच बदल. समाजाचं, कुटुंबाचं असलेलं वेगळेपण जपायला लागणार! कधी धाकधूक, कधी बिनधास्त वृत्ती, कधी अनिश्चितता. सारं काही अधांतरी आता कोणता मार्ग, कुठली वाट दिशा ठरवूयात बरं. प्रत्येकालाच या कार्यकालाचा निरोप द्यायचा असतो. निरोपाची जाणीव मनी हुरहुर लावणारी. रोजचा नवा अनुभव घेत इतक्या वर्षांचा तो संचय केलेला. कधी कौतुक, अवहेलना, तिरस्कार, प्रोत्साहन, द्वेष, शोषण, सहाय्य सारे अनुभव एकत्र करून मनाच्या कप्प्यात खोल दडी मारून बसले आहेत. आज डबा खाता खाता सुचलेल्या चारोळ्या. कप्प्यात गप्पात रंगलेली मैत्रीची मैफल.
कधी अंताक्षरी, वाढदिवस, पार्टीची फर्माईश, सहकाऱ्यांकडून मिळालेल्या रंगीत शुभेच्छा, पत्रातील हृदयस्पर्शी मजकूर, दसरा दिवाळीच्या भेटी, सजावट,रोषणाई, मिठाई आता सगळे स्तब्ध. एकदम शांत झाले. उद्यापासून खुर्चीवरून खाली झालो की, पद नाही. पदावरून हललो की मान नाही आणि मग काय सुन्नपणा. आठवणी, गमती जमती, गोष्टी आठवणीतच. आयुष्याची संध्याकाळ ही सेवानिवृत्तीची निरोपाची झालर. ही कृतज्ञता या शब्दाला सजवलं होतं. मनी द्विधास्थिती होती. एकीकडे आनंद, एकीकडे दुःख. सारखं चलबिचल, हुरहुर, निरोपाची खंत आतापर्यंत नाही वेळ मिळाला स्वतःसाठी. आतापर्यंत नाही रजा मिळाली स्वतःसाठी. आता चारधाम करू. युरोप दौरा करू. गावाकडे बंगला बांधू. मुलांची लग्न, सारं सारं करू. सेवेतील मुक्ती एक जबाबदारी संपली तरी पुढे हजार उभ्या होत्या. युनियनची कामे, मित्रांची भिशी, विवाहाच्या ग्रुपची कामे, गावच्या फंडाची मीटिंग, नातवंडांच्या जबाबदाऱ्या, नातेवाईकांच्या मागण्या सारे काही करत आपल्या जबाबदारीचं कधीच संपत नाहीत. संपून जातो जन्म. फिटून जाते कर्ज. पण माणूस काहीच जगून घेत नाही. त्याच्या स्वप्नांचा पाठलाग आणि मग पूर्णविराम आयुष्याचा! जगून घ्या काही क्षण जे पुन्हा येणार नाहीत.
निरोप समारंभात सर्वांनी भाषणे केली. मनोगत व्यक्त केले. मन भरून शुभेच्छा दिल्या. भेटवस्तू सत्कार समारंभ मायेच्या शाली, पुस्तके, फुले सारं काही देत होते. पण मन मात्र कुठेच रमत नव्हतं. सगळ्यांसाठी सगळं केलं आता स्वतःसाठी जगा. सगळ्यांसाठी सगळं दिलं आता स्वतःला न्याय द्या. मग कुठेतरी पश्चाताप, रुकरुक लागून राहते. वेळ निघून जाते आणि निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही. अजून जगायचं होतं पण राहूनच गेलं असा पश्चाताप करून घेऊ नका. हा एकच दिवस असतो स्वतःच्या आत्मपरीक्षणाचा, आयुष्यभराचा जमाखर्च मांडण्याचा. सारं ठरवलेलं असतं हे करू ते करू जमेल तितकं केलं पाहिजे. आनंदाने जगलं पाहिजे. असा निश्चय मनाशी करा. पुन्हा एकदा कृतज्ञ सोहळ्यातील क्षण आठवा आणि पुढे चालत राहा कोण जाणे? किती दिवस उरलेत ते !
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…