नवी दिल्ली : भारत सरकारचा उपक्रम असलेल्या BSNL ने ग्राहकांना सरप्राईज गिफ्ट दिले आहे. BSNL ने ग्राहकांसाठी ४२५ दिवसांचा आकर्षक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन घेतल्यास १५ महिने रिचार्ज करम्याची चिंता करावी लागणार नाही. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज दोन जीबी या पद्धतीने ४२५ दिवसांकरिता ८५० जीबी डेटा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या २३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये लोकल आणि हायस्पीड अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळेल. तसेच दररोज १०० एसएमएस विनामूल्य करता येतील.
ज्यांना बीएसएनएलचा २३९९ रुपयांच्या प्लॅन महाग वाटत असेल त्यांच्यासाठी बीएसएनएलने १९९९ रुपयांचा ३६५ दिवसांचा प्लॅन सादर केला आहे. यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह ६०० जीबी हायस्पीड डेटा मिळेल. तसेच दररोज १०० एसएमएस विनामूल्य करता येतील. या व्यतिरिक्त बीएसएनएलने ३४७ रुपयांचा ५४ दिवसांचा प्लॅन सादर केला आहे. यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह दररोज दोन जीबी हायस्पीड डेटा मिळेल. तसेच दररोज १०० एसएमएस विनामूल्य करता येतील. या संदर्भातील अधिकृत माहिती बीएसएनएलच्या वेबसाईटवर तसेच बीएसएनएलच्या अधिकृत डीलर्सकडे मिळू शकेल.