

रिक्षाचालक मुजाहिदने केली माजी आमदाराची हत्या
बेळगावी : कर्नाटकमधील बेळगावी जिल्ह्यात रिक्षा चालक मुजाहिदने गोव्याचे माजी आमदार लवू मामलतदार (६८) यांची हत्या केली. ते २०१२ ते २०१७ या कालावधीत फोंडा ...
ज्यांना बीएसएनएलचा २३९९ रुपयांच्या प्लॅन महाग वाटत असेल त्यांच्यासाठी बीएसएनएलने १९९९ रुपयांचा ३६५ दिवसांचा प्लॅन सादर केला आहे. यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह ६०० जीबी हायस्पीड डेटा मिळेल. तसेच दररोज १०० एसएमएस विनामूल्य करता येतील. या व्यतिरिक्त बीएसएनएलने ३४७ रुपयांचा ५४ दिवसांचा प्लॅन सादर केला आहे. यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह दररोज दोन जीबी हायस्पीड डेटा मिळेल. तसेच दररोज १०० एसएमएस विनामूल्य करता येतील. या संदर्भातील अधिकृत माहिती बीएसएनएलच्या वेबसाईटवर तसेच बीएसएनएलच्या अधिकृत डीलर्सकडे मिळू शकेल.