Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीAmbernath Temple : अंबरनाथचे शिवमंदिर जागतिक पातळीवर झळकणार!

Ambernath Temple : अंबरनाथचे शिवमंदिर जागतिक पातळीवर झळकणार!

उल्हासनगर : उल्हासनगर अंबरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यांची जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश खा. डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिले आहेत. शनिवारी अंबरनाथ शहरातील विविध विकासकामांची पाहणी करताना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. धार्मिक स्थळांचे संवर्धन, सांस्कृतिक आणि क्रीडा सुविधांचा विकास, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा यावर भर देण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे अंबरनाथ शहराचे रूप पालटणार असून नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. (Ambernath Temple)

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! मस्जिद बंदर येथील इमारतीला आग; २ जणांचा मृत्यू

अंबरनाथ शहराची ओळख असलेल्या सुमारे ९०० वर्षांहून अधिक प्राचीन शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी १४० कोटींचा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे मंदिराला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, हा उद्देश असून, काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पांतर्गत मंदिर परिसराचा संपूर्ण विकास काळ्या पाषाणात होणार आहे. भव्य प्रवेशद्वार आणि आकर्षक संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. मंदिरासमोरील चौकात नंदीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, वाहनतळ, भक्तनिवास आणि प्रदर्शन केंद्राची उभारणीदेखील करण्यात येणार आहे. तसेच प्राचीन कुंडाचे जतन आणि घाटाची निर्मिती देखील करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, वाराणसीप्रमाणेच या ठिकाणी भाविकांना घाट आरतीचा अनुभव घेता येणार आहे. प्राचीन कुंडाचे काम पूर्णत्वास आले असून, घाट उभारणीला वेग आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंबरनाथ शहराचा धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या कायापालट होणार आहे. (Ambernath Temple)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -