अमरावती : अमरावतीहून नागपूरला जाणाऱ्या भरधाव शिवशाही एसटी बसचं पुढचं टायर आपोआप निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या शिवशाही बस नागपूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. (Shivshahi Bus Accident)
Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! मस्जिद बंदर येथील इमारतीला आग; २ जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीवरून नागपूरला जाणाऱ्या भरधाव शिवशाही एसटी बसचं पुढचं टायर आपोआप निघून आलं. भरधाव बसचं टायर निखळल्यानंतर ते लांब अंतरावर गेलं. मात्र सुदैवाने ५० पेक्षा अधिक प्रवाशांचा थोडक्यात जीव वाचला. अमरावती नागपूर महामार्गावर ही धक्कादायक घटना घडली. काही दिवसांपूर्वी परतवाडा आगाराच्या बसचा ही अशाच प्रकारे टायर निघून आल्याचा प्रकार पाहायला मिळाला होता. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनानंतर एसटी महामंडळाचे बसच्या मेंटेनन्सकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय.
दरम्यान, या घटनेचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे एसटी परिवहन महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा सवाल केला जात आहे. (Shivshahi Bus Accident)