नवी दिल्ली : नियमांचे उल्लंघन किंवा पालन न करणे तसेच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बँकांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कठोर पाऊले उचलत असते. नुकतेच नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर (New India Co-operative Bank) काही निर्बंध (RBI Action) लादले. यामध्ये या बँकेतील खअते धारकांना पैसे ठेवणे आणि काढण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेबाहेर खात्यातील पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, आरबीआयने याआधी प्राईव्हेटसह अनेक सहकारी बँकेवर अशा प्रकारची कारवाई केली आहे. मात्र बँक आर्थिक अडचणीत सापडल्यास ग्राहकांच्या पैशांचे काय होते, पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी खातेधारकांनी काय करावे (Bank Issue), हे जाणून घ्या.
Shani Shingnapur : शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलाचाच अभिषेक! शनि शिंगणापूर देवस्थानचा निर्णय
- कोणतीही बँक डबघाईला आली किंवा आरबीआयने तिचा परवाना रद्द केला, तर ग्राहकांना त्यांच्या खात्यातील जास्तीत जास्त ५ लाख रुपये मिळू शकतात.
- ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण (DICGC) असते. त्यामुळे ग्राहकाचे खाते, एफडी आणि बचत खाते मिळून
- एकूण ५ लाखांपर्यंतच रक्कम परत मिळते. तसेच जर एका बँकेत वेगवेगळ्या शाखांमध्ये पैसे ठेवले असतील, तरीही जास्तीत जास्त ५ लाख मिळू शकतात.
पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे?
- पूर्ण रक्कम एका बँकेत ठेवण्याऐवजी वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवा.
- पब्लिक सेक्टर बँका (PSU) आणि मोठ्या खाजगी बँकांमध्ये पैसे जमा करा.
- को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये मोठी रक्कम ठेवण्यापासून टाळा.
- एकाच बँकेत ५ लाखांहून अधिक ठेवी ठेवू नका, कारण विमा संरक्षणाची मर्यादा ५ लाखांपर्यंतच आहे.
- जर तुमच्याकडे ८ लाख रुपये असतील आणि ते दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवले असतील (प्रत्येकी ४ लाख), आणि जर दोन्ही बँका दिवाळखोरीत गेल्या, तरीही तुम्हाला पूर्ण ८ लाख रुपये परत मिळू शकतात.
कोणत्या बँकेत पैसे ठेवणे सुरक्षित?
- राष्ट्रीयीकृत (PSU) बँकांमध्ये ठेवी ठेवा – जसे की SBI, Bank of Baroda, PNB इत्यादी.
- मोठ्या खाजगी बँकांमध्ये ठेवा – HDFC, ICICI, Kotak Mahindra इत्यादी.
- को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम ठेवण्यापासून टाळा. (Bank Issue)