Thursday, March 20, 2025
Homeमहाराष्ट्रशिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे होणार शिवजयंती दिवशी लोकार्पण

शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे होणार शिवजयंती दिवशी लोकार्पण

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

पुणे : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा आता पूर्णत्वास आला आहे. येत्या शिवजयंतीच्या दिवशी (१९ फेब्रुवारी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित असतील, अशी माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त जगदीश कदम यांनी शनिवारी शिवसृष्टी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, सल्लागार संदीप जाधव व शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल पवार उपस्थित होते.

पद्म विभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मूळ संकल्पनेतून शिवसृष्टी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची साकारला जात आहे. या टप्प्यामध्ये प्रामुख्याने एक भव्य स्वागत कक्ष, एखाद्या आधुनिक थीम पार्कला साजेल असे टाईम मशीन थिएटर व तुळजा भवानी मातेचे भव्य मंदिर यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक माणूस म्हणून कसे होते, हे देखील लोकांपर्यंत पोहोचवायला हवे असे बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न होते. त्यानुसार या टप्प्याची रचना करण्यात आली आहे.

शहराचे पाणी बंद करण्याचा ‘जलसंपदा’चा इशारा

या टप्प्याच्या निर्मितीमध्ये सुमारे रुपये ८७ कोटी इतकी गुंतवणूक करण्यात आली असून स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा ही शिवाजी महाराजांना जवळची असणारी महत्त्वाची ३ तत्त्वे यावर या टप्प्याच्या निर्मितीमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत असलेल्या तुळजा भवानी मातेचे मंदिर या टप्प्यात साकारण्यात आले आहे व आता शिवसृष्टी पाहण्यासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना दर्शनासाठी खुले असणार आहे. सदर मंदिर हे प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची तंतोतंत प्रतिकृती असून अगदी बांधकामात वापरण्यात आलेला दगड देखील सारखा आहे.

येत्या १७ फेब्रुवारीला तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची मंदिरात विधिवत स्थापना करण्यात येणार आहे. ही मूर्ती मूर्तीशास्त्राचे अभ्यासक व तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडवण्यात आली असल्याचे जगदीश कदम
यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -