Tuesday, May 13, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Kesari Tours: 'केसरी टूर्स'चे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचे निधन

Kesari Tours: 'केसरी टूर्स'चे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचे निधन
मुंबई : मराठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेली एक पर्यटन कंपनी अशी 'केसरी टूर्स'ची ओळख सांगितली जाते. या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचे शनिवार १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी केसरी टूर्सची स्थापना केली होती. आज केसरी टूर्स ही एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी म्हणून ओळखली जाते.



केसरी पाटील यांना पर्यटन क्षेत्रीतील एक विद्यापीठ म्हणून ओळखतात. अथक परिश्रम आणि कठीण संघर्षातून त्यांनी 'केसरी टूर्स' एका उंचीवर नेऊन ठेवले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत बांद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.
Comments
Add Comment