Tuesday, May 13, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडी

मराठी पत्रकारांच्या साहित्याचा ठसा दिल्लीत उमटणार

मराठी पत्रकारांच्या साहित्याचा ठसा दिल्लीत उमटणार
मुंबई : साहित्याचा ठसा आता दिल्लीत उमटणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन मुंबई मराठी पत्रकार संघाने दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळी आयोजित केले आहे.



संमेलनाची आमंत्रक संस्था सरहद आणि संस्थेचे प्रमुख संजय नाहर यांनी या आयोजनासाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे. दिल्लीत तालकटोरा स्टेडियम येथे २१ ते २३ फेब्रुवारी ‌‍‌२०२५ या कालावधीत संपन्न होणाऱ्या साहित्य संमेलनात पत्रकार संघाचा स्टॉल साहित्यप्रेमींचे लक्ष वेधून घेणार आहे. पत्रकार संघाचे सदस्य असलेल्या पत्रकारांनी लिहिलेले प्रत्येकी एक पुस्तक या स्टॉलवर असावे, असे आयोजन करण्यात येत आहे. या स्टॉलची जबाबदारी पत्रकार संघाचे अंतर्गत हिशोब तपासनीस प्रा. हेमंत सामंत आणि सदस्य राजेंद्र साळस्कर सांभाळणार आहेत. या प्रदर्शनात मांडण्यासाठी सदस्यांनी स्वलिखित पुस्तकांपैकी कुठल्याही एकाच पुस्तकाची प्रत' १६ फेब्रुवारीपर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Add Comment