Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीAvinash Vishwajeet : अविनाश-विश्वजीत संगीतकार देणार नववर्षाची पहिली भेट; रंगवणार सांगीतिक मैफल!

Avinash Vishwajeet : अविनाश-विश्वजीत संगीतकार देणार नववर्षाची पहिली भेट; रंगवणार सांगीतिक मैफल!

मुंबई : ‘मुंबई -पुणे-मुंबई’ ह्या चित्रपटापासून हृदयात वाजे समथिंग’, ‘साथ दे तु मला’, धर्मवीर अशा अनेक गाण्यांनी प्रसिद्ध झालेले अविनाश -विश्वजीत (Avinash Vishwajeet) ह्या संगीतकारांची जोडी संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली आहे. या संगीतकारांनी सुमधूर संगीताच्या बळावर असंख्य रसिकांच्या मनावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. अशातच यंदाचे वर्ष या संगीतकारांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.

Darsheel Safary : ‘तारे जमीन पर’ फेम अभिनेत्याने साजरा केला आगळावेगळा ‘व्हॅलेंटाइन्स डे’!

२०२५ मध्ये अनेक सुमधुर गीतांची भेट या दोघांकडून रसिकांना मिळणार आहे. या संगीतकार जोडीचे अनेक मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत. त्यासोबतच त्यांच्या सांगीतिक कार्यक्रमांची मेजवानी सुद्धा रसिकांना महाराष्ट्रातील विविध शहरांतून घेता येणार आहे. तसेच नव्या वर्षातील पहिली सांगीतिक मैफल येत्या शनिवारी २२ फेब्रुवारीला दीनानाथ मंगेशकर रंगमंदिर, विलेपार्ले येथे रात्री ८ वाजून ४५ मिनिट वाजता रंगणार आहे. वसुंधरा संजीवनी या संस्थेच्या एका खास सामाजिक उपक्रमाच्या हेतूने ही सांगीतिक मैफल आयोजित करण्यात आली आहे.

‘मुंबई -पुणे-मुंबई’ ह्या चित्रपटापासून अविनाश -विश्वजीत ह्या संगीतकार जोडीची खऱ्या अर्थाने संगीतप्रेमींना ओळख झाली. ‘कधी तू’, ‘का कळेना’, ‘कधी तु रिमझिम झरणारी बरसात’, ‘ओल्या सांजवेळी’, ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘साथ दे तु मला’ या प्रेमगीतांसोबत असा हा धर्मवीर, ‘ भेटला विठ्ठल माझा’, “खंबीर तु हंबीर तु” ‘मदनमंजिरी’, ‘हे शारदे’ या सारखी आज गाजत असलेली गाणीही त्यांनी संगीतबद्ध केली आहेत. (Avinash Vishwajeet)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -