मेट्रोच्या बीकेसी - कुलाबा मार्गाचे ९३ टक्के काम पूर्ण

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रो ३ प्रकल्पातील बीकेसी - कुलाबा टप्प्याचे ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२५ अखेर प्रवाशांसाठी हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी मेट्रोच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. बीकेसी-आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचं बांधकाम वेगाने सुरू आहे. यामुळे बीकेसी - कुलाबा टप्प्यातील मेट्रो सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.



'फेज 2ए' च्या बांधकामासोबतच त्याचं स्ट्रक्चर आणि सिस्टमॅटिक फंक्शन शेवटच्या टप्प्यात आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर हा टप्पा वाहतूक सेवेत आणण्यासाठी आवश्यक अंतिम मंजुरी दिली जाईल. बीकेसी - कुलाबा मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली तर मुंबईतील बीकेसी-आचार्य अत्रे चौक आणि वरळी या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.



मुंबई मेट्रो अॅक्वालाईनची एकूण लांबी ३३.५ किमी आहे. या मार्गावर एकूण २७ स्थानकं आहेत.हा मार्ग कफ परेडला बीकेसीशी तर आरेला जेव्हीएलआरशी जोडतो. याआधी पंतप्रधान मोदींनी याच मार्गावरील १२.६९ किमी लांबीच्या फेज १ चे उद्घाटन केले आहे. हे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी ऑक्टोबर २०२४ मध्ये केले होते. आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो गेल्याने बीकेसी ते वरळी दरम्यान मेट्रोची कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. भूमिगत मेट्रोचे तिकीट एलिवेटेड मेट्रोच्या तुलनेत जास्त आहे. याच कारणामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो भाड्याच्या दरात पुनर्विचार करण्याची मागणी केली होती.
Comments
Add Comment

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तपासात आली भलतीच माहिती समोर

मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल