Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीPrajakta Mali : प्राजक्ता होणार चुलबुली! चाहत्यांना दिसणार हटके अंदाजात

Prajakta Mali : प्राजक्ता होणार चुलबुली! चाहत्यांना दिसणार हटके अंदाजात

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात (Entertainment News) सध्या एकामागोमाग एक नव्या चित्रपटाची घोषणा होत आहेत. त्यामुळे सिनेप्रेमींसह चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी उपलब्ध झाली आहे. अशातच आता प्रसाद खांडेकरने दिग्दर्शन केलेला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ (Chiki Chiki Booboom Boom) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, वनिता खरात, प्रसाद खांडेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका प्राजक्ता माळी (Prajakta Mali) देखील या चित्रपटात आगळीवेगळी भूमिका करणार आहे.

Best Bus Price Hike : ‘बेस्ट’चा प्रवास महागणार! तिकीट दरात होणार दुप्पट वाढ  

अभिनय, नृत्य व निर्माती अशा विविध भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न प्राजक्ता नेहमीच करत आली आहे. आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात ती रावी या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. रावी ही अतिशय चुलबुली आणि उत्साही आहे पण त्याचवेळी ती गोंधळलेली सुद्धा आहे. विनोदाचा वेगळा बाज असलेली ही चॅलेंजिंग भूमिका प्राजक्ता साकारत आहे.

धमाल, मस्ती, हास्याचे स्फोट उडवत २८ फेब्रुवारीला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी देणार आहे. नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे. (Prajakta Mali)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -