Wednesday, March 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPM Narendra Modi : अमेरिकेतून निष्कासित भारतीयांबाबत नरेंद्र मोदींचं मोठं विधान

PM Narendra Modi : अमेरिकेतून निष्कासित भारतीयांबाबत नरेंद्र मोदींचं मोठं विधान

वॉशिंगटन : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना अमेरिकेतून हाकलण्यास सुरुवात केली आहे.आतापर्यंत अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या १०४ भारतीयांनाही अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आले होते.याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत घेतलेल्या संयक्त पत्रकार परिषदेमध्ये एक मोठं विधान केलं आहे. आम्ही अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना परत घेत आहोत. मात्र आमच्यासाठी ही गोष्ट इथेच थांबत नाही, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

https://x.com/narendramodi/status/1890344911800791470

बेकायदेशीर राहणाऱ्या नागरिकांविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच मोदींनी सांगितले की, हा प्रश्न केवळ भारताचा नाही आहे. जागतिक दृष्टीकोनातून पाहिल्यास जे लोक बेकायदेशीररीत्या एखाद्या देशात राहतात, त्यांना तिथे राहण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आता भारत आणि अमेरिकेबाबत बोलायचं झाल्यास जो खरा भारतीय नागरिक असेल आणि तो अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असेल, तर त्याला परत घेण्यास भारत तयार आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

Mahakumbh Mela 2025 : मुख्यमंत्री फडणवीसांनी सहकुटुंब केले त्रिवेणी संगमात स्नान

या विधानाच्या माध्यातून मोदींनी भारतात बेकायदेशीररीत्या राहणारे बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, हे लोक सामान्य कुटुंबातील मुलं असतात. त्यांना मोठमोठी स्वप्नं दाखवली जातात. बहुतांश लोकांना दिशाभूल करून आणलं जातं. त्यामुळे मानव तस्करीमध्ये गुंतलेल्या या संपूर्ण इको सिस्टिमवर वार करण्याची आवश्यकता आहे. मानव तस्करी बंद करण्यासाठी या प्रकारच्या इकोसिस्टिमला संपवण्यासाठी भारत आणि अमेरिका मिळून प्रयत्न करत आहेत.डोनाल्ड ट्रम्प हेसुद्धा या इकोसिस्टिमला पराभूत करण्याच्या लढाईत भारताला मदत करतील, असा मला विश्वास आहे, असेही मोदींनी शेवटी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -