
मुंबई : बुधवार १९ फेब्रुवारी पासून गाडी क्रमांक २०१०१/२०१०२ नागपूर-सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस २० डब्यांऐवजी ८ डब्यांसह चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सप्टेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ३३.८१% आणि सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचा सरासरी प्रवास दर हा ३३.८७% आहे. डब्यांच्या संख्येत कपात केल्याने सेवा कार्यक्षमता वाढेल,गाडीची वेळ सुधारेल आणि उच्च-तंत्रज्ञानाच्या रोलिंग स्टॉकचा योग्य वापर होईल, तसेच प्रवाशांना प्रीमियम वंदे भारतचा अनुभव मिळेल.
हा उपक्रम प्रवर्तन आणि संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेशी सुसंगत असून ज्यामुळे गरजेनुसार आणि वापरानुसार आधुनिक तंत्रज्ञान प्रवाशांना मिळेल असा विश्वास रेल्वेला आहे . या बदलामुळे सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही आणि प्रवाशांना जलद प्रवास, सुधारित आराम आणि अत्याधुनिक ऑनबोर्ड सुविधांसह जागतिक दर्जाच्या सुविधांचा आनंद
घेता येईल.