जेरूसलेम : हमासने शनिवारपर्यंत आणखी काही अपहृतांना न सोडल्यास युद्धबंदीच्या करारातून माघार घेत पुन्हा एकदा हल्ले सुरू करू, असा इशारा इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाच सल्ला त्यांना दिला होता. इस्राईलकडून शस्त्रसंधीचे पालन होत नसून गाझामध्ये मदत येऊ दिली जात नसल्याचा आरोप करत हमासने अपहृतांची सुटका लांबणीवर टाकली आहे. हमासने अपहृतांना न सोडल्यास त्यांच्यावर हल्ले करावेत, असा सल्ला ट्रम्प यांनी दिल्यावरही हमास आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहे.
‘…तर शस्त्रसंधी रद्द करणार’
